सायनाची भूमिका श्रद्धा नाही, तर ‘ही’ अभिनेत्री साकारणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

सायनाची भूमिका श्रद्धा नाही, तर ‘ही’ अभिनेत्री साकारणार

मुंबई – भारताची फुलराणी सायना नेहवाल हिचा जीवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सायनाच्या भूमिकेत अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार होती. मात्र श्रद्धाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ती या चित्रपटातून बाहेर पडली आहे. आता श्रद्धाच्या जागी परिणीती चोप्राची वर्णी लागली आहे. सप्टेंबर २०१८मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले होते. मात्र चित्रीकरण सुरू होताच श्रद्धाला डेंग्यू झाल्यामुळे तिने काही काळ ब्रेक घेतला. एप्रिलमध्ये पुन्हा सायनाच्या चित्रपटाचे काम सुरू होणार होते मात्र श्रद्धाने त्यापूर्वीच दुसऱ्या चित्रपटांसाठी तारखा दिल्या असल्याने तिला नाईलाजाने हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. २०२० पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. आता सायना भूमिकेत परिणीतीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News देश निवडणूक

बिहारमध्ये महाआघाडीचे जागावाटप जाहीर

पाटणा – लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये आज महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा झाली. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांच्या महाआघाडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More