सामाजिक,आर्थिकदृष्ट्या मागास शेतकऱ्यांना आरक्षण द्या – शरद पवार – eNavakal
News मुंबई राजकीय

सामाजिक,आर्थिकदृष्ट्या मागास शेतकऱ्यांना आरक्षण द्या – शरद पवार

मुंबई – सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास शेतकऱ्यांना आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली आहे. मात्र मागास शेतकऱ्यांनाच आरक्षण द्यावे सधन वगैरे शेतकऱ्यांबाबत हा विषय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पवार म्हणाले, “दिवसेंदिवस शेती कमी होतेय. 82 टक्के लोकांकडे 2 एकरपेक्षा कमी शेती. तर 70 ते 72 टक्के शेतजमीनीला पाणी नाही. त्यामुळे आर्थिक निकषासोबत शेतकी व्यवसाय करणाऱ्या वर्गाला शेतकरी म्हणून आरक्षण द्यायला हवे.” तयारी न करता शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली. त्यामुळे दिवसेंदिवस लाभार्थी आणि निधीचा आकडा कमीकमी होत आहे, असा टोलाही पवारांनी लगावला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? यावरून...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

भारतीय हॉकी संघ पराभूत

भुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको

जयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला केला उशीर – पी. चिदंबरम

नवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला उशीर केला. नोटबंदिच्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिला असता तर सरकारच...
Read More