साध्वी प्रज्ञाने शपथ घेताना गुरुचे नाव घेतल्याने गदारोळ – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

साध्वी प्रज्ञाने शपथ घेताना गुरुचे नाव घेतल्याने गदारोळ

नवी दिल्ली – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या भोपाळच्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सोमवारी संसदेच्या अधिवेशनात शपथ घेतली आणि पुन्हा वाद निर्माण झाला. त्यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली आणि मी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर स्वामी पूर्णचेतनानंद अवधेशानंद गिरी असल्याचे म्हटले. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. मात्र लोकसभेचे हंगामी अध्यक्ष वीरेंद्र कुमार यांनी सदस्याचे जे नाव उमेदवार यादीत असेल तेच नाव ग्राह्य धरले जाईल असे स्पष्ट केले. त्यानंतर विरोधक शपथपत्रातील त्यांचे नाव शोधू लागले. मात्र त्यात त्यांच्या नावापुढे त्यांच्या गुरूंच्या नावाचा उल्लेख नसल्याचे आढळले. त्यामुळे मोठा गोंधळ झाला. तसेच प्रज्ञा यांना वडिलांचे नाव घेऊन शपथ घ्या, असेही सांगितले मग त्यांनी पुन्हा वडिलांच्या नावासह शपथ घेतली.

सतराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात पहिल्या दिवशी सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. ज्यावेळी प्रज्ञा ठाकूर यांची वेळ आली त्यावेळी त्यांनी आपल्या नावासह गुरुचे नावही घेतले. अध्यक्षांनी त्यांना संविधान किंवा ईश्वराच्या साक्षीने शपथ घ्या असे म्हटल्यावर ईश्वराच्याच साक्षीने शपथ घेत असून माझ्या त्याच नावाने घेत आहे जे उमेदवारी अर्जावर लिहिले आहे, असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र विरोधकांनी हा प्रचंड आक्षेप घेतला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More