करकरेंबद्दल विधान, भाजपने केले हात वर – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

करकरेंबद्दल विधान, भाजपने केले हात वर

नवी दिल्ली –  प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरेंबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. ‘हेमंत करकरें यांना दहशतवाद्यांनी मारून माझं सूतक संपवलं’ असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं होते. यामुळे साध्वी आणि भाजपवर टीकेची झोड उठली असताना भाजपने मात्र ‘हे साध्वी यांचे ते वैयक्तिक मत आहे’, असे स्पष्ट करत हात वर केले आहेत.

‘साध्वी प्रज्ञा यांनी जे विधान केले आहे, ते त्यांचे वैयक्तिक मत आसून त्यांनी जो शारीरिक आणि मानसिक छळ सहन केला, त्यातून त्यांनी हे विधान केले असावे, दिवंगत हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले, भाजपने त्यांना शहीद मानले आहे आणि हीच भाजपची करकरेंविषयीची भावना आहे’, असे भाजपच्या मुख्यालयातून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. भाजप कार्यालय सचिव महेंद्र पांडेय यांनी हे पत्र प्रसिद्धीस दिले आहे.

साध्वीचे वादग्रस्त विधान

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर भोपाळमधील प्रचारसभेत बोलताना त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी पुरावे नसतानाही त्यांनी मला तुरुंगात ठेवले, मी खूप त्रास सहन केला. मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी माझे सुतक सुरु झाले होते. हेमंत करकरें यांना दहशतवाद्यांनी मारून माझं सूतक संपवलं’, असे धक्कादायक वक्तव्य साध्वी यांनी केले आहे. यामुळे त्यांच्या वक्तव्याचा सर्वंच स्तरातूून निषेध व्यक्त होत आहे. निवडणूक आयोगाकडेही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर आयपीएस असोसिएशननेही साध्वीच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.  या सर्वं घडामोडींनतर भाजपने तातडीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत साध्वीच्या वक्तव्याचा पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर – मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आजही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही मात्र आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांमुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मोदी ‘या’ दिवशी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक २०१९चे निकाल काल जाहीर झाले. भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने सर्वसामान्यांसह सर्वांनाच थक्क केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीएने देशात...
Read More