सातार्‍यात रासायनिक खत खाल्ल्याने ३ बालके रुग्णालयात – eNavakal
महाराष्ट्र

सातार्‍यात रासायनिक खत खाल्ल्याने ३ बालके रुग्णालयात

सातारा – उसतोड कामगारांच्या लहान मुलांनी शेतातील रासायनिक खत व एरंडाच्या बिया खाल्ल्याने त्यांना त्रास होवू लागला त्यामुळे 3 बालकांना तातडीने सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धाराशिव येथून कळंबे (ता. सातारा) येथे उसतोडणीचे काम करण्यासाठी मजूर आपल्या कुटुंबीयांसह आलेले आहेत. यावेळी मुलांचे आई व वडील ऊस तोडण्याचे काम करत असताना शेतात त्यांच्यासोबत असलेली लहान मुले बाजूला खेळत असताना शेतात टाकलेले रासायनिक खत चार वर्षाची बालिका पुनम रविंद्र राठोड (रा. कळंबे, ता. सातारा) हिने खाल्ले. त्यामुळे ऊस तोड कामगारांनी तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत शेतातील सहा वर्षांची बालिका माऊली विष्णू राठोड व दीड वर्षाचा बालक किरण विकास राठोड यांनी एरंडाच्या विषारी बिया खाल्ल्या, त्यामुळे त्यांनाही उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे या बालकांनाही तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

गोदावरी नदीत बोट बुडाली; ५ जणांचे मृतदेह सापडले

हैदराबाद – आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात गोदावरी नदीमध्ये पर्यटकांची बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीतून एकूण ६१ जण प्रवास करत होते, अशी माहिती...
Read More
post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More