सातार्‍यात उदयनराजेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

सातार्‍यात उदयनराजेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक

सातारा – आपल्या वक्तव्यासाठी कायम चर्चेत राहिलेले सातार्‍याचे राष्ट्रवादीचे खा. उदयनराजे भोसले यांनी आज एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तोंडभरून कौतुक केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सातार्‍यात आज खंबाटकी घाटातील तीन मार्गिकेच्या बोगद्याचा कोनशिला समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला गडकरी, फडणवीस आणि उदयनराजे हे उपस्थित होते. उदयनराजे आपल्या भाषणात म्हणाले की, मुख्यमंत्री जे बोलतात तेच करून दाखवतात. त्यामुळे लोक त्यांना या कामाची नक्की पोचपावती देतील. मराठा आरक्षणाबाबत बोलतानाही त्यांनी आघाडी सरकारला अप्रत्यक्ष टोला मारत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आरक्षणाबाबतच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भाजपा नेत्यांशी थेट संपर्क साधू लागल्याने राष्ट्रवादीच्या गोटात धुसपूस चालू आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र मुंबई

मॉल पार्किंग मोफत देण्याचा कायदा आहे का? मुंबई हायकोर्टाचा पुणे पालिकेला सवाल

मुंबई – पुणेकरांना मॉलमध्ये पार्किंग शुल्क फ्री करण्याबाबत पालिकेचा कायदा आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. पार्किंगचे शुल्क वसूल करण्यास मनाई...
Read More
post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More