सातारा जिल्ह्यात छावण्यांमुळे जनावरांच्या चारा – पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत – eNavakal
News महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात छावण्यांमुळे जनावरांच्या चारा – पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत

सातारा – सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पाणी टंचाईबरोबरच चारा टंचाई निर्माण झाली आहे. सध्या चारा नसल्याने पशुधनाची जोपासना करणे अवघड बनले असून पशुपालकांसमोर पशुधन वाचवण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत चारा छावण्यांमुळे मुक्या जनावरांच्या चारा – पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटण्यास मदत झाली आहे. मात्र यासंबंधातील अट शासनाने शिथिल करून शेतकर्‍यांकडे जेवढी जनावरे आहेत, तेवढी छावण्यांमध्ये दाखल करून घ्यावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून जिल्ह्यातील धरण, तलाव व विहिरीतील पाणी पातळीने तळ गाठला आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 183 गावे व 770 वाड्या – वस्त्यांना 219 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. माण तालुक्यात 25 ठिकाणी चारा छावण्या सुरु असून, त्यामध्ये 28 हजार 306 छोटी – मोठी जनावरे दाखल आहेत.
माण तालुक्यात गेल्या दोन – तीन वर्षात अत्यल्प पाऊस झाला आहे. यावर्षी तर त्याची मोठी तीव्रता वाढली आहे. दुष्काळी तालुक्यातील अनेक लोकांचा उदरनिर्वाह हा पशुपालनावर आहे. मात्र आज चारा नसल्याने पशुधन धोक्यात आले आहे. मका, कडवळ, ऊसाचे भाव तसेच कडब्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून, ते शोधताना पशुमालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक शेतकर्‍यांनी आपली जनावरे नातेवाईकांकडे सांभाळण्यासाठी दिली आहेत, तर काहींना आपली जनावरे कवडीमोल किंमतीने विकावी लागत आहेत.
माण तालुक्यातील भालवडी, भाटकी, अनभुलेवाडी, जाधववाडी, बिजवडी, वरकुटे- म्हसवड, मोगराळे, आंधळी, शिंदेवाडी, पाचवड, वडगाव, पांगरी, इंजबाव, राजवडी, येळेवाडी, बोराटवाडी, जांभुळणी, पर्यंती, हिंगणी, दानवलेवाडी, पिंगळी बुद्रुक, वावरहिरे, बिदाल अशा 24 छावण्यांमध्ये 16 हजार 984 मोठी जनावरे तर 3 हजार 165 लहान जनावरे अशी एकूण 20 हजार 149 जनावरे तर म्हसवड येथील माणदेशी संस्थेच्या चारा छावणीमध्ये 8 हजार 157 जनावरे आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे, तेव्हा निवडणुका जिंकूच! आदित्य ठाकरे

धुळे – युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही. नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी आहे’, असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सोज्वळ अभिनेत्री उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३१ मे १९४५ साली कोल्हापूर येथे झाला. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांनी मराठी रसिक मनावर...
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरच्या सातपाटी परिसरात यंदा पापलेटच्या उत्पादनात घट

पालघर – राज्यासह जगभरात निर्यात होणार्‍या पालघरच्या सातपाटी परिसरातील पापलेट या मत्स्याच्या प्रकारामध्ये यंदा प्रचंड घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन गेल्या हंगामापेक्षा 190 टनांनी घटले...
Read More