सातारा, कोल्हापूर, पुण्याला परतीच्या पावसाने झोडपले – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सातारा, कोल्हापूर, पुण्याला परतीच्या पावसाने झोडपले

पुणे – सातारा, कोल्हापूर, पुण्यात आजही परतीच्या पावसाचा जोर कायम राहिला. सातार्‍यातील पाटण तालुक्यासह मल्हारपेठ परिसरात ढगफुटीसदृश्य झालेल्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. ऊरूल, मारूल, हवेली परिसराला पावसाचा जोरदार मार बसला. तेथील शेतातून ओढ्याच्या पाण्याचे लोट गेल्याने शेती वाहून गेली. पुणे- सातारा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. कोल्हापूर शहरासह दुपारपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे कोल्हापूर शहरातील जयंती पूलावर एक फूट पाणी साचले होते. तेथील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.
ठाणे, मुंबईसह उपनगरांममध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती आणि तेथील वातावरण दिवसभर ढगाळ होते. दुसरीकडे पुणे, पालघर, नाशिक, मनमाड, कराडमध्येही पाऊस सुरू होता. पुण्यात कालपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस आजही सुरूच राहिल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली. पुण्यातील खडकवासला, आनंदनगर, शिंगणे, राजाराम पूल, कात्रज, धनकवडी, सिंहगड रस्ता. वडगाव, लष्कर भाग, वानवडीमध्ये मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर पाणी साठले होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. तर सांगलीतील वाळवा तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. तर सोयाबिन आणि काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले. मनमाडसह नांदगाव तालुक्याला जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे तेथील शेतकर्‍यांनी काढून ठेवलेला मका आणि बाजरी पावसात भिजून गेली. तसेच नांदेडमध्ये पहाटे चार वाजल्यापासून पावसाची चांगलीच संततधार सुरु झाली होती. विजांच्या कडकडाटासह नांदेडमध्ये सर्वदूर दमदार पाऊस कोसळला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

‘अपनों के विघ्नों ने घेरा’ – संजय राऊत

मुंबई – दररोज ट्विट आणि पत्रकार परिषदेतून भाजपावर तोफ डागणारे संजय राऊत यांनी आज ‘अपनों के विघ्नों ने घेरा’ असे म्हणत भाजपाला डिवचले आहे. आज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

ज्युलियन असांजेला दिलासा; बलात्काराचा गुन्हा रद्द

लंडन – अमेरिकेसह अन्य देशांची गोपनीय राजनैतिक व लष्करी कागदपत्रे उघड करून जगभरात खळबळ उडवून देणारा ‘विकिलीक्स’चा संस्थापक ज्युलियन असांजे याला मोठा दिलासा मिळाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘चैत्या’ आता तेलुगू चित्रपटात झळकणार

मुंबई – अभिनेते, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ चित्रपटातून झळकलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार श्रीनिवास पोकळे अर्थात सर्वांचा लाडका चैत्या आता तेलुगू चित्रपटात दिसणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

संध्याकाळी ५ वाजता कॉंग्रेस-एनसीपी बैठक; सोनिया गांधी आणि पवार उपस्थित राहणार नाहीत

मुंबई – आज संध्याकाळी ५ वाजता राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची बैठक पार पडणार आहे. परंतु या बैठकीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि...
Read More
post-image
News मुंबई

संजय राऊत यांनी पुन्हा घेतली शरद पवारांची भेट

मुंबई- कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आज दिल्लीतील बैठका रद्द करण्यात आल्याने महाराष्ट्रातील सत्तापेचाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी आज सलग...
Read More