साक्रीयेथील घटना टाळण्यासाठी नीलम गो-हेनी सुचविल्या उपाययोजना – eNavakal
News आजच्या ठळक बातम्या महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

साक्रीयेथील घटना टाळण्यासाठी नीलम गो-हेनी सुचविल्या उपाययोजना

धुळे – साक्री येथील घडलेल्या घटना पुन्हा घडू नये यासाठी टास्क फोर्स किंवा आयोग नेमावा, अशी मागणी शिवसेना आमदार नीलम गो-हे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये ९७ अन्वये चर्चेमध्ये केली.

धुळे जिल्ह्यातील साक्री येथे पाच लोक किडनी चोरण्यासाठी आणि मुले पळविण्यासाठी आलेले आहेत अशा अफवामुळे त्या भागात नाथपंथी डवरी समाजातील ५ निष्पाप लोकांना जमावाने ठार मारले. याच प्रकारच्या अफवा आणि घटना मालेगाव, परभणी, लातूर, संभाजीनगर या भागात पूर्वी झालेल्या आहेत. तसेच देशातील झारखंड, बिहार, ईशान्य भारतातील भागात असे आता पर्यंत एकूण २२ लोकांचे बळी गेले आहेत.
याविषयी सभागृहामध्ये बोलताना आ.डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,  संवेदनशील आणि समाजात तिढा निर्माण करणाऱ्या अशा केसेस फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवाव्यात. यासाठी बाळकृष्ण रेणके यांनी भटक्या जमाती बाबत अहवाल मांडला आहे त्याचा आधार घेऊन या समाजाला न्याय देण्यासाठी निधी उपलब्ध करुन टास्क फोर्स किंवा एखादा आयोग नेमण्यात यावे.  तसेच, भटक्या समाजातील लोकांचे प्रत्येक आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये पुनर्वसन करावे व त्यासाठी विशेष योजना आणि निधीची तरतूद करण्यात यावी, असंही त्या म्हणाल्या.  याचबरोबर व्हॉट्सअपवर येणाऱ्या अफवांवर पायबंद घालण्यासाठी, अफवांची अफवा करणाऱ्या समाजकंटकांना गृहराज्यमंत्री ज्यांनी तो मेसेज तयार केला असेल, अशा व्यक्तीला शिक्षा करावी, यासाठी नवीन कायदा तयार करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तर  मानवी तस्करी, किडन्या चोरणाऱ्या टोळ्या असा कुणाबाबत संशय आल्यास त्यांना मारून कायदा हातात न घेता त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी सभागृहात केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

नारायणगावात कोंबडीच्या खुरड्यात बिबट्या जेरबंद

नारायणगाव – ओतुर जवळील आहिनेवाडी येथील शेतकरी किरण कैलास अहिंनवे यांच्या कोंबडीच्या खुरड्यात नर जातीचा बिबट्या भक्षाच्या शोधात जेरबंद झाला. माणिकडोह येथील रेस्क्यू टीमला...
Read More
post-image
महाराष्ट्र

शासनाने अनुदानरुपाने साखर कारखान्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे

नारायणगाव – सध्या साखरेचे दर निचांकी पातळीवर खाली आलेले आहेत. त्याचप्रमाणे इतर उपपदार्थाचेही दर कमी झाले असल्याने सर्वच साखर कारखान्यांना उस उत्पादक शेतकऱ्यांना एफ....
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीत भ्रष्टाचार-निलेश राणे

रत्नागिरी – रविवारी मुंबईत निघालेल्या म्हाडाच्या लॉटरीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. याबाबत आपण कोर्टात जाणार असल्याचेही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

क्वीन कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा ट्रेलर प्रदर्शित

नवी दिल्ली – बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतच्या बहुप्रतीक्षित ‘मणिकर्णिका; द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित...
Read More