साकिनाकामध्ये महिलेवर बलात्कार करणार्‍यला 20 मेपर्यंत पो. कोठडी – eNavakal
News मुंबई

साकिनाकामध्ये महिलेवर बलात्कार करणार्‍यला 20 मेपर्यंत पो. कोठडी

मुंबई – साकिनाका येथे एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तिचाच सुपरवायझर अधिकारी असलेल्या अरविंद नारायण सुर्वे याला बुधवारी साकिनाका पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने 20 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत महिला आणि आरोपी एकाच कंपनीचे कर्मचारी असून घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिच्या घरात घुसून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
32 वर्षांची पिडीत महिला तिच्या पती आणि दोन मुलांसोबत साकिनाका परिसरात राहते. ती एका कंपनीत हाऊसकिपिंगचे काम करते तर तिचे पती फर्निचर बनविण्याचे काम करतात. तिच्यासोबत दोन महिला आणि दोन पुरुष असे चारजण हाऊसकिपिंगचे काम करीत असून त्यांच्याकडे अरविंद सुर्वे हा सुपरवायझर म्हणून काम करीत होता. 10 मेला ही महिला तिच्या सहकारी महिलेसोबत बोलत असताना तिथे अरविंद सुर्वे आला. यावेळी या दोघांनी त्यांना कधीही पैशांची गरज असेल तर सांगा असे सांगून त्यांच्याकडे त्यांचा मोबाईल मोबाईल क्रमांक
घेतला होता.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर – मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आजही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही मात्र आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांमुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मोदी ‘या’ दिवशी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक २०१९चे निकाल काल जाहीर झाले. भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने सर्वसामान्यांसह सर्वांनाच थक्क केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीएने देशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

भाजपाच्या विजयानंतर मोदींनी अडवाणी, जोशींची घेतली भेट

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची...
Read More