साई चरणी 14 कोटी 82 लाख रोख सोने चांदी आणि विदेशी चलनही दान – eNavakal
अन्य महाराष्ट्र

साई चरणी 14 कोटी 82 लाख रोख सोने चांदी आणि विदेशी चलनही दान

शिर्डी- चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्ताने 23 डिसेंबर ते 1 जानेवारी याकाळात सुमारे 9 लाख साईभक्तांनी श्री साईबाबांचे समाधी दर्शन घेतले असून याकालावधीत सुमारे 14 कोटी 82 लाख रोख तर; सोने ,चांदी, डेबिट-क्रेडीट कार्ड,ऑनलाईन, चेक-डिडी, मनिऑर्डर व परकीय चलन देणगी स्वरुपात प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.
या काळात 1 लाख भाविकांनी सशुल्क दर्शनाचा लाभ घेतला आहे. दक्षिणा पेटीमध्ये 8 कोटी 34 लाख, देणगी काऊंटर 3 कोटी 8 लाख 29 हजार, डेबीट-क्रेडीट कार्डद्वारे 1 कोटी 27 हजार, ऑनलाईनद्वारे 64 लाख 23 हजार, चेक-डीडीद्वारे 86 लाख 12 हजार, मनीऑर्डरद्वारे 10 लाख 2 हजार असा देणगी स्त्रोतचा समावेश असून 1177.170 ग्रॅम सोने व 19,955 ग्रॅम चांदीचा यात समावेश आहे. तसेच अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सौदी अरेबिया, दक्षिणअफ्रिका, श्रीलंका, नेपाळ, ओमान, कुवैत, केनिया, मॉरिशस, व्हियतनाम, थायलंड, अरब अमिरात, कतार, चीन व जपान अशा 21 देशातील साईभक्तांनी अंदाजे रुपये 41 लाख 22 हजार किंमतीचे परकीय चलन संस्थानच्या दक्षिणा पेटीत दान करण्यात आहे. तसेच याकालावधीत श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईप्रसादालयात 6 लाख 59 हजार 380 साईभक्तांनी मोफत प्रसादभोजनाचा लाभ घेतला. तर 1 लाख 24 हजार भाविकांनी नाष्टा पाकीटाचा लाभ घेतला. या कालावधीत दर्शनरांगेमध्ये 9 लाख 14 हजार भाविकांनी मोफत बुंदी प्रसाद पाकीटाचा लाभ घेतला असून 5 लाख 66 हजार 900 लाडू प्रसाद पाकीटांची विक्री झाली. त्यातून संस्थानला 1 कोटी 41 लाख 72 हजार 500 रुपये प्राप्त झाले आहेत. लाडू, दैनंदिनी, दिनदर्शिका इत्यादींची विक्री ना नफा ना तोटा या तत्वावर केली जात असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पाव खरेदीला गेला मारहाण करून आला

भिवंडी – भिवंडी शहरात कामघत येथील हनुमान नगर परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. परिसरातील मोरया किरणा दुकानामध्ये झालेल्या किरकोळ वादातून दुकानाची तोडफोड करून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शिवस्मारकाचं काम २४ ऑक्टोबर सुरु होणार 

मुंबई – अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यात येणार असून त्याचे काम २४ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. एल अँँड टी कंपनीला स्मारक उभारण्याचे कंत्राट देण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo चेतन भगत म्हणतो ‘मीच पीडित’

मुंबई – #MeToo मोहिमेचे वारे सध्या सर्वत्र वाहत आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध लेखक चेतन भगतवर एका महिलेने अश्लील संभाषण केल्याचा आरोप केला होता. परंतु...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (०१-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

कल्याण – डोंबिवलीकरांना उद्या पिण्याचे पाणी नाही

कल्याण – यंदाच्या कमी झालेल्या पावसाचे सावट राज्यात हिवाळ्यापासून  भासु लागले आहे. त्याचाच फटका ठाणे जिल्हवासियांसोबतच कल्याण, डोंबिवली येथे राहणाऱ्या जनतेलासुद्धा बसला आहे. ठाणे...
Read More