साईंच्या चरणी कोट्यांवधीची ठेवी – eNavakal
News महाराष्ट्र

साईंच्या चरणी कोट्यांवधीची ठेवी

शिर्डी- शनिवार-रविवार आणि नाताळ अशा जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक साईभक्तांनी शिर्डीकडे धाव घेतली, त्यामुळे चार दिवसात साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींचं दान जमा झालं आहे. सलग आलेल्या सुट्टयांमुळे चार दिवसात पाच कोटी 50 लाख रुपयांचं एकूण दान मिळालं आहे. साईबाबांच्या दानपेटीत 3 कोटी 10 लाख रुपये जमा झाले आहेत. तर 22 लाख रुपये किमतीचं सोनं, तर दोन लाखांची चांदी साईबाबांच्या झोळीत जमा झाली आहे. मागील वर्षी पाच दिवसात आलेल्या दानाच्या तुलनेत यावेळी तब्बल एक कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

शिर्डीला राज्यातूनच नव्हे तर देशभरातील साईभक्त दर्शनासाठी येतात. दरवर्षी साईबाबांच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणावर दान जमा होतं. 22 डिसेंबरपासून शिर्डीत साई भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सलग आलेल्या सुट्ट्या आणि नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसात आलेल्या साईभक्तांनी बाबांच्या दानपेटीत देणगी स्वरुपात पाच कोटी 50 लाख रुपयांचं विक्रमी दान अर्पण केलं.

दानाचे वर्गीकरण

ऑनलाइन व्दारे – दहा लाख आठ हजार
देणगी काऊंटर – एक कोटी दहा लाख
डेबीट / क्रेडीट कार्ड – 38 लाख 40 हजार
डीडी / चेक – 23 लाख 58 हजार
मनीऑर्डर – दोन लाख 35 हजार
सोने – 781 ग्रॅम ( 22 लाख रुपये )
चांदी – सात किलो 600 ग्रॅम ( दोन लाख 15 हजार )

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
Uncategoriz

दिवाळीत साखर स्वस्त होणार

मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळ निघत अशी आरडाओरड करणाऱ्या रेशनकार्ड धारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. साखर आणि डाळीच्या दरात घट करण्यात आली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात वाढ

दिल्ली – केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे व्याजदर...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळ’चे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस – रविंद्र वायकर यांच्यात संघर्ष पेटला

मुंबई –  आरे येथे असलेल्या आदिवासी पाड्यातील जवळपास २ हजार आदीवासींसाठी एसआरएची घरे उपलब्ध करून देत ही घरे किमान ४८० चौरस फुटाचे देण्याची घोषणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

सलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता

नवी दिल्ली – स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालानुसार, सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2018 या वर्षात डिजीटल न्यूज चार्टवर सर्वाधिक जास्त सलमान ‘भाई’ आणि ‘राणी पद्मावती’...
Read More