सांगलीत भाजपला राष्ट्रवादीचे धोबीपछाड! महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी विजयी – eNavakal
News महाराष्ट्र

सांगलीत भाजपला राष्ट्रवादीचे धोबीपछाड! महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी विजयी

सांगली-  बंडखोरी टाळण्यात अपयश आल्यामुळे सांगलीतील महापौर पदाच्या निवडणुकीत बहुमत असलेल्या सत्ताधारी भाजपला मोठा हादरा बसला आहे. आज सकाळी झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत या दोन्ही जागांवर आपल्या पक्षांचे उमेदवार विजयी केले आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाले असून उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेश पाटील विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपची 5 मते फुटली, तर 2 नगरसेवक गैरहजर राहिले.

सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज सकाळी 11 वाजता सुरू झाली. कोरोनामुळे या निवडणुकीसाठी ऑनलाइन मतदान घेण्यात आले. महापौरपदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी तर राष्ट्रवादीकडून दिग्विजय सूर्यवंशी मैदानात उतरले होते. तथापि भाजपचे 7 नगरसेवक अगोदरच राष्ट्रवादीच्या गळाला लागले होते. त्यामुळे सांगली महापालिका भाजपच्या हातातून निसटून राष्ट्रवादीच्या हातात जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत भाजपच्या विजय घाडगे, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम आणि नसीमा नाईक या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केले. त्यामुळे 39 मते मिळवून ते विजयी झाले. भाजपच्या धिरज सूर्यवंशी यांना 36 मते मिळाली. त्यांचा 3 मतांनी पराभव झाला. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेश पाटील विजयी झाले आहेत. सांगली महापालिकेत भाजपचे 41 नगरसेवक असून त्यांना 2 अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांचे एकूण संख्याबळ 43 आहे. माजी महापौर अरुण शिकलगार यांचे निधन झाल्यामुळे काँग्रेसचे 19 आणि राष्ट्रवादीचे 15 नगरसेवक सांगली महापालिकेत आहेत. बहुमतासाठी 39 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक होता. यामुळे होमग्राऊंडवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पराभवाची धूळ चारली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News महाराष्ट्र

सांगलीत भाजपला राष्ट्रवादीचे धोबीपछाड! महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी विजयी

सांगली-  बंडखोरी टाळण्यात अपयश आल्यामुळे सांगलीतील महापौर पदाच्या निवडणुकीत बहुमत असलेल्या सत्ताधारी भाजपला मोठा हादरा बसला आहे. आज सकाळी झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या...
Read More
post-image
News विदेश

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 17 मेपर्यंत ब्रिटनमध्ये बंदी

लंडन- ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्याचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 17 मेपर्यंत बंदी घातली आहे. केवळ अत्यावश्यक...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

कुख्यात गुंड रवी पुजारीला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई- कुख्यात गुंड रवी पुजारीला आज कर्नाटकवरून मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्याला कुलाब्यातील गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणी मुंबईतील मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी...
Read More
post-image
देश

पाच राज्यांकडून पेट्रोल-डिझेलवर करकपात

नवी दिल्ली – दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांची चिंता प्रचंड वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांमध्ये झालेली वाढ आणि केंद्र व राज्य सरकारकडून...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मी फक्त माध्यमांपासून दूर गेलो होतो – संजय राठोड

वाशिम – पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत...
Read More