सांगलीत कापड दुकानाला भीषण आग – eNavakal
News महाराष्ट्र

सांगलीत कापड दुकानाला भीषण आग

सांगली- तासगाव जवळील भिवघाट येथील ’श्री साई’ कापड दुकानाला शनिवारी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. सकाळी 10 वाजताच्या सुमारास शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सुमारे 40 लाखांचा माल जळून खाक झाला आहे. आटपाडी रोडवरील तासगाव नजीकच्या भिवघाट येथे हे कापड दुकान आहे. दुकानात मोठ्या प्रमाणात कापड असल्याने या आगीची तीव्रता काही वेळातच वाढली होती. घटनेची माहिती मिळताच विटा आणि तासगाव अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More