सहा महिन्यानंतर अक्षयकुमारसाठी आली ‘गोल्ड’न मोमेंट – eNavakal
देश मनोरंजन

सहा महिन्यानंतर अक्षयकुमारसाठी आली ‘गोल्ड’न मोमेंट

मुंबई – यंदा फेब्रुवारी माहिन्यात रिलीज झालेल्या आपल्या पॅडमॅन चित्रपटामूळे अक्षय कुमार स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता  बनला होता. त्यानंतर सहा महिन्यात बहूतेक आठवड्याच्या अखेरीस सलमान खानच नंबर वन स्थानी असल्याचं दिसून येतं होतं. मात्र आता सहा महिन्यानंतर पून्हा एकदा खिलाडी कुमारने बाजी मारली आहे.

आपल्या गोल्ड सिनेमाच्या लोकप्रियतेमूळे अक्षय कुमार पून्हा एकदा स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनला आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या माहितीनूसार, अक्षयकुमार 81 गुणांसह सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. तर दबंग खान 69 गुणांसह दूस-या स्थानी आणि अमिताभ बच्चन 67 गुणांसह तिस-या स्थानावर आहेत. किंग खान 37 गुणांसह चौथ्या स्थानी तर संजय दत्त 32 गुणांसह पांचव्या स्थानी आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात,, “जेव्हा जेव्हा अक्षयकुमारचा चित्रपट येतो, तेव्हा लोकप्रियतेमध्ये कोणी त्याला मागे टाकू शकत नाही, हे ह्या गोष्टीने सिध्द झालंय. सहा महिन्यांपूर्वी जेव्हा अक्षयकुमारचा पॅडमॅन सिनेमा आला होता तेव्हा संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात सर्वत्र खिलाडीकुमारच दिसत होता. आता सुध्दा जेव्हा गोल्ड चित्रपट रिलीज होतोय. सहा महिन्यांपासून जवळ जवळ प्रत्येक आठवड्यामध्ये नंबर वन असलेल्या सलमान खानला त्याने मागे टाकले आहे.”

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होणार

मुंबई – राज्यभरात डान्सबार पुन्हा सुरू करावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने साडेपाच तास डान्सबार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच डान्सबारमध्ये...
Read More
post-image
गुन्हे देश

नवापूरच्या अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये अत्याचार

नंदुरबार – नवापूर येथील अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तीन आरोपींवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित...
Read More