सहा महिन्यात होणार 24 हजार शिक्षकांची भरती- शिक्षणमंत्री – eNavakal
मुंबई शिक्षण

सहा महिन्यात होणार 24 हजार शिक्षकांची भरती- शिक्षणमंत्री

मुंबई – आगामी सहा महिन्यात राज्यात शिक्षकांच्या 24 हजार जागा भरल्या जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिेलेल्या मुलाखतीत दिली आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील डीएड आणि बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

विनोद तावडे म्हणाले की, “आधीच्या पद्धतीमध्ये प्रत्येक तुकडीला एक शिक्षक अशी संकल्पना होती. पण राईट टू एज्युकेशन ही संकल्पना मोडित निघाली. त्यानंतर आघाडी सरकारच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या संख्येमागे शिक्षक अशी संकल्पना सुरु झाली. त्यात 30 विद्यार्थ्यांमागे एक, तर 60 विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक दिले जायचे. पण यावर शिक्षक आमदार कोर्टात जाऊन, या निर्णयाला स्थगिती आणायचे. त्यामुळे एकीकडे शिक्षक भरती करुन घ्यायची आणि दुसरीकडे कोर्टाकडून स्थगिती मिळायची. त्यामुळे तत्कालिन सरकारने शिक्षक भरतीच बंद करुन टाकली.”

तावडे पुढे म्हणाले की, “पण आम्ही संख्या मान्यतेच्या आधारे शिक्षक भरती कशी योग्य आहे? हे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात सिद्ध केलं, आणि त्यानंतर सेंटर भरती केली. कारण, अनेक शिक्षकांचा आग्रह होता की, शिक्षक भरतीवेळी काही संस्थाचालक पाच लाखापासून ते 15 लाखापर्यंतची मागणी करतात. तेव्हा हा भ्रष्टाचार थांबवण्याचं आवाहन शिक्षकांनी केलं होतं. त्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सेंटर शिक्षक भरती करुन घेतली. यात एक ते 78 हजार असा प्राधान्यक्रम निश्चित करुन जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या थांबवल्या. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यातील शिक्षकांच्या बदल्यांची शेवटची प्रक्रिया पूर्ण झाली की शाळेप्रमाणे शिक्षकभरती पुन्हा सुरु केली जाईल.”

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More