सहकार नगरमधील इमारतींची महापौर महाडेश्वरांनी केली पाहणी – eNavakal
News मुंबई

सहकार नगरमधील इमारतींची महापौर महाडेश्वरांनी केली पाहणी

मुंबई- वडाळ्याच्या सहकार नगर वसाहतीमधील काही इमारतींचे स्लॅब कोसळत असून भविष्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी संबंधित अधिकारी यांनी या धोकादायक इमारतींचे तातडीने बांधकाम संरचनात्मक परिक्षण (स्ट्रॅक्चरल ऑडीट) करून घ्यावे, असे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.

वडाळाच्या नायगांव क्रॉस मार्गावरील सहकार नगर वसाहतीतील महापालिका भाडेकरूंच्या इमारतींची महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज बुधवारी दुपारी पालिका अधिकार्‍यांसमवेत पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार राहूल शेवाळे, माजी महापौर तथा नगरसेविका श्रद्धा जाधव नगरसेवक अमेय घोले, माजी नगरसेवक तसेच संबंधित पालिका अधिकारी उपस्थित होते. महापौर म्हणाले या वसाहतींमध्ये एकूण 49 इमारती असून यापैकी ज्या इमारतींची दुरुस्ती अद्यापही झाली नाही, अशा सर्वच तसेच ज्यांची यापूर्वी दुरुस्ती झाली आहे, परंतु त्या इमारतींमध्ये सुद्धा स्लॅब कोसळण्याचे प्रकार होत असेल तर या सर्व इमारतींचे तातडीने बांधकाम संरचनात्मक परिक्षण करून तातडीने अहवाल सादर करावा, जेणेकरुन या इमारतींच्या दुरुस्ती कामाला तातडीने प्रारंभ होऊन येथील नागरिकांना दिलासा मिळेल असेही महापौर म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More