सहकारमंत्री सुभाष देशमुखांचे आरक्षित जागेत अनधिकृत बांधकाम – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र राजकीय

सहकारमंत्री सुभाष देशमुखांचे आरक्षित जागेत अनधिकृत बांधकाम

सोलापूर – राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता असून अग्निशमन दलासाठी आरक्षित जागेवर देशमुखांनी बंगला बांधल्याचा आरोप आहे.

सुभाष देशमुखांनी होटगी रोडवरील अग्निशमन दलाच्या आरक्षित जागेवर आलिशान बंगला बांधल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरक्षित जागेवर नियमबाह्य आणि बेकायदा बांधकाम केल्याचा ठपका सुभाष देशमुखांवर ठेवण्यात आला आहे. त्याविषयी महेश चव्हाण यांनी उच्च न्यायालयात सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाच्या बेकायदा बांधकाम विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. याप्रकरणी १० ऑगस्ट २०१६ रोजी न्या. केमकर यांनी महापालिकेला तीन महिन्यात निर्णय देण्याचे आदेश दिले होते. मात्र, यावर पालिकेने उत्तर दिली नाही. याप्रकरणी अण्णाराव भोपळेसह तिघांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली असून १६ मार्च रोजी न्या. अभय ओक यांच्यासमोर सुनावणी होईल. तर महानगरपालिका आयुक्तांनी या प्रकरणात सुभाष देशमुखांना सुनावणीसाठी १७ मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सहकार मंत्र्यांना महापालिकेत हजर राहून आपली बाजू मांडण्याची नोटीस बजावण्यात आल्यामुळे देशमुख काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेआधीचे भारतीय संघाचे वेळापत्रक! दोन सराव सामने

मुंबई – आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा येत्या 30 मे पासून सुरू होणार असून या स्पर्धेआधीचे भारतीय संघाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय संघ...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

लोकसभा निवडणूक विशेष बुलेटीन (23-05-2019)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ! ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More