सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा अडचणीत – eNavakal

पुणे – रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कुलने जागा नाकारल्यामुळेे यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव अडचणीत आला आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे हे ६६ वे  वर्ष आहे. या महोत्सवाला पुण्यात महत्वाचं स्थान आहे.

डेक्कन एज्युकेशन संस्थेच्या परिसरात तब्बल तीन दशकांपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत होते. डेक्कन संस्थेने शाळेच्या क्रीडा प्रशिक्षण वर्गाचे कारण देत जागा न देऊ शकण्याचे पत्र ‘आर्य संगीत प्रसारक’ मंडळाला पाठविले आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष ‘श्रीनिवास जोशी’ यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवाला अवघे दोन महिने बाकी आहेत आणि अचानक डेक्कन संस्थेने घेतलेल्या या निर्णयामुळे सवाई गंधर्व भिमसेन महोत्सवाच्या आयोजकांसमोर मोठा प्रश्न ऊभा राहिला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

(अपडेट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणास मराठीतून सुरुवात

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते कल्याणमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. ३३...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मोदींच्या सभेसाठी परिसरातील दुकाने बंद; व्यापारी संतप्त

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले. मोदी कल्याणमध्ये दाखल होणार असल्याने मोठा सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कर्मचार्‍यांचे 27 डिसेंबरला उपोषण

मुंबई – मुंबईतील वाचन संस्कृती वाढावी म्हणून मेहनत करणार्‍या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कर्मचार्‍यांना गेल्या अनेक वर्षांत वेतनवाढ व बढती मिळालेली नाही. तीन वेळा आंदोलन करूनही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज ठाकरेंना इगतपुरी कोर्टात जामीन मंजूर

इगतपुरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना इगतपुरी कोर्टात जामीन मंजूर करण्यात आले आहे. २००८ साली परप्रांतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल...
Read More