सलामीवीर राहुलचा अनोखा विक्रम – eNavakal
क्रीडा देश

सलामीवीर राहुलचा अनोखा विक्रम

जयपूर – यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणार्‍या पंजाबचा सलामीचा शैलीदार फलंदाज के.एल. राहुलच्या नावावर येथे झालेल्या राजस्थानविरूद्धच्या आयपीएल सामन्यात अनोख्या विक्रमाची नोंद झाली. यंदाच्या स्पर्धेत दिल्लीविरूद्धच्या पहिल्या सामन्यात राहुलने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक फटकावून स्पर्धेतील वेगवान अर्धशतक काढण्याचा मान मिळविला होता. राजस्थानविरूद्धच्या लढतीत त्याने 70 चेंडू खेळताना नाबाद 95 धावा केल्या. त्याने आपले अर्धशतक 48 चेंडूत पूर्ण केले. आयपीएलच्या या सत्रातील हे सर्वात संथ अर्धशतक होते. यंदाच्या या स्पर्धेत त्याने 10 सामन्यात दोनवेळा नाबाद राहताना 471 धावा केल्या आहेत. 53.75च्या सरासरीने धावांची बरसात करताना त्याने 4 अर्धशतके फटकाविली. मोठी खेळी करून संघाला विजय मिळवून न देणार्‍या फलंदाजांमध्ये आता राहुलचा तिसरा क्रमांक लागतो. या आगोदर नमन ओझा 94 धावा आणि विराट कोहली 92 धावा यांनी मोठी खेळी करूनदेखील आपल्या संघाला विजय मिळवू देण्यात ते अपयशी ठरले होते.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

इलेक्ट्रिक बस करार रद्द! बेस्टला हायकोर्टाचा दणका

मुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...
Read More
post-image
News मुंबई

‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका

मुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....
Read More
post-image
News देश

एम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप! महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड

नवी दिल्ली-  लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...
Read More
post-image
News मुंबई

नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण

मुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर

ग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...
Read More