(अपडेट)सलमान खानची जोधपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी – eNavakal
गुन्हे देश

(अपडेट)सलमान खानची जोधपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

जोधपूर – काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि १० हजारांचा दंड सुनावला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर सलमानची  जोधपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. बिष्णोई समाजाचे कार्यकर्ते आणि सलमानचे अनेक फॅन्स सध्या जोधपूर मध्यवर्ती कारागृहाबाहेर जमा झाले आहेत. बिष्णोई समाजाकडून सलमान खानविरोधात घोषणा दिल्या जात आहेत.
  सलमानचे वकील जामिनासाठी जोधपुर सत्र न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत. तर सलमान सोबत शिकारीच्यावेळी जिप्सीमध्ये उपस्थित असणारे सहकलाकार अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रेची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जोधपुर जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्या. देवकुमार खत्री यांनी निकाल सुनावला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
Uncategoriz

अजयने शेअर केला पत्नी काजोलचा मोबाईल नंबर

मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा पर्सनल मोबाईल नंबर मिळावा आणि त्यांच्याशी एकदा तरी फोनवर प्रत्यक्षात बोलता याव अशी इच्छा प्रत्येक चाहत्याची असते....
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – गणेशमंडळांनाच समुपदेशनाची गरज

गणेशविसर्जनाच्या काळात सर्व प्रकारची काळजी घेऊनही अनेकांचे बळी जाण्याचा प्रकार धक्कादायक ठरतो. याबद्दलचा निश्चित आकडा उपलब्ध झाला नसला तरी दोन लहान मुले आणि नाशिकच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

राज्यभरात विसर्जनादरम्यान 20 जणांचा बुडून मृत्यू

मुंबई –  ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत मुंबईसह राज्यभरातील गणपती बाप्पाला निरोप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उत्तर भारतात पावसाचे थैमान, ८ जणांचा मृत्यू

चंडीगड – केरळमध्ये पावसाने हैदोस घातल्यानंतर आता उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे ८ जणांना जीवाला मुकावे लागले आहेत. तर, पंजाब, हरयाणा...
Read More