सलमानपेक्षा ‘बाबा’ जास्त ट्रेंडीग – eNavakal
Uncategoriz

सलमानपेक्षा ‘बाबा’ जास्त ट्रेंडीग

मुंबई –

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रियतेच्या चार्टवर संजय दत्त सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनला आहे. संजय दत्तच्या जीवनावर बनलेल्या संजू चित्रपटामूळे त्याच्या लोकप्रियतेत ही लक्षणीय वाढ झालेली आहे.  भारतीय सिनेमाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत असेल की, एखादा अभिनेता एखाद्या चित्रपटाचा भाग नसतानाही त्या चित्रपटाच्या लोकप्रियतेमूळे अभिनेता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचावा.

संजय दत्तची आत्मकथा संजू सिनेमाव्दारे सिल्व्हर स्क्रिनवर झळकल्यावर चित्रपटाने अभूतपूर्व बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. आणि मग जादूची कांडी फिरवल्यासारखी संजय दत्तचीही लोकप्रियता वाढली. 61 गुणांसह सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनलेल्या संजय दत्तने प्रसिध्दीत आपला मित्र सलमान खानला मागे टाकले आहे. संजय दत्त प्रमाणेच संजू चित्रपटाचा अभिनेता रणबीर कपूरला ही सिनेमाच्या प्रसिध्दीचा फायदा झाला. रणबीर कपूर 44 गुणांसह तिसर-या स्थानी पोहोचला आहे. रणबीरने लोकप्रियतेमध्ये अक्षय कुमार आणि बिग बींनाही मागे टाकले आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “संजू चित्रपटाच्या प्रमोशनमूळे संजय दत्तविषयी गेल्या काही दिवसांमध्ये न्यूज प्रिंट, आणि डिजीटल विश्वात भरपूर लिहीलं गेले आहे. सोशल मीडियावर सुध्दा संजय दत्तविषयी भरपूर चर्चा झाली. संजू चित्रपटाच्या लोकप्रियतेमूळे संजयची लोकप्रियताही एवढी वाढली की गेल्या काही आठवड्यांपासून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या सलमान खानला मागे टाकत, संजय दत्त सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनला.” अश्वनी कौल पूढे म्हणतात, ” 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

मी दया मागणार नाही, न्यायालय देईल ती शिक्षा मान्य- प्रशांत भूषण

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरलेले ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या शिक्षेवरील सुनावणी आज पार पडली. न्यायालयाच्या निर्णयाने आपल्याला प्रचंड वेदना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मोहरमसाठी नियमावली जाहीर, मातम मिरवणुकीस परवानगी नाही

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मुस्लीम बांधवांचा मोहरम सण साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या गृह खात्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यंदाचा मोहरम साध्या पध्दतीने...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

चेंबूरच्या पगडीवाला गणपतीची यंदा ऑनलाईन दर्शन सुविधा

मुंबई – परदेशातील मराठी गणेश भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या चेंबूरच्या पगडीवाला गणपतीचे यंदा कोरोना परिस्थितीमूळे प्रत्यक्ष दर्शन बंद राहणार आहे. चेंबूर गावठाणातील या एकमेव प्रसिद्ध घरगुती गणपतीचे दर्शन ऑनलाईन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राम मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा अजिबात वापर नाही, श्रीराम जन्मभूमी ट्रस्टची माहिती

अयोध्या – अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा अजिबात वापर केला जाणार नाही, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली....
Read More
post-image
देश

जीमेलचं सर्व्हर डाऊन, फाईल्स शेअरिंग खोळंबले

संदेशवहनासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे गुगल जीमेल आज ठप्प झाले होते. म्हणजेच जीमेलचे सर्व्हर डाऊन झालं आहे. भारतासह अनेक देशांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. ईमेल...
Read More