सलग सुट्ट्यांमुळे मुंबईत मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता – eNavakal
News मुंबई

सलग सुट्ट्यांमुळे मुंबईत मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता

मुंबई – 27 एप्रिल ते 29 एप्रिलपर्यंत तीन दिवस सलग सरकारी सुट्ट्या आल्यामुळे मुंबईकर सुट्ट्या साजरी कऱण्यासाठी मुंबईबाहेर निघून जाण्यासाठी शक्यता आहे. याचा फटका लोकसभा निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना बसणार आहे. परिणामी मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत 29 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. 27 एप्रिल चौथा शनिवार असल्याने सुट्टी आहे. तर 28 एप्रिल रविवार आणि 29 एप्रिल सोमवार या दिवशी मतदान आहे. अशा प्रकारे सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. या सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी बहुतांशी लोक आपल्या कुटुंबासह बाहेरगावी जातील आणि परिणाम मतदानावर होईल अशी धास्ती उमेदवारांना वाटू लागली आहे. त्यात शालेय मुलांच्या वार्षिक परीक्षा झाल्यामुळे अनेक कुटुंब आपल्या मुलांसह उन्हाळी सुट्टीसाठी यापूर्वी गावाला गेले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ‘हे’ फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More