#ProKabaddi यू मुम्बाची जयपूर पिंक पँथर्सवर मात – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#ProKabaddi यू मुम्बाची जयपूर पिंक पँथर्सवर मात

चेन्नई – प्रो कब्बडी लीगचे सहावे पर्व सुरु आहे. आज यू मुम्बा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात यू मुम्बा सात गुणांनी वरचढ आहे. जयपुर पिंक पॅंथर 32 गुण तर यू मुम्बा हा संघ 39 गुणांनी विजयी झाला. महत्वाचं म्हणजे सलग पाच वर्ष यू मुम्बाची कप्तान म्हणून बाजू सांभाळणारा अनुप कुमार आज जयपूरचा कप्तान बनून यू मुम्बाच्या विरुद्ध खेळत होता, पण यू मुम्बाच्या सिध्दार्थ देसाईची खेळी जयपुर पिंक पॅंथरसाठी आक्रमक ठरली.

प्रो कब्बडी लीगच्या सहाव्या पर्वातील जयपुर पिंक पॅंथरचा हा पहिला सामना होता. गेल्या पाच वर्षात यू मुम्बाच्या विजयात अनुप कुमारचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्याच्या खेळाच्या शैलीने यू मुम्बा हा संघ प्रो. कब्बडी लीगमध्ये वरचे स्थान राखुन होता. त्यामुळे अनुप कुमारची जयपुरमध्ये झालेली एंट्री ही आनेकांच्या भुवया उंचावणारी होती.

आजचा सामना प्रेक्षकांनी यु मुंबा विरुध्द अनुप कुमार असाच अनुभवला. तर अनुप कुमारच्याच हाताखाली तयार झालेल्या संघाने त्याने शिकवलेल्या डावपेचांचा वापर करुन मुसंडी मारली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More
post-image
News मुंबई

सांताक्रुझमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर! पालिकेची डोळेझाक

मुंबई – राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरांवर बंदी लागू केल्यानंतरही सांताक्रुझ (पुर्व) भागातील फेरीवाले व काही दुकानदार प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करताना...
Read More
post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More