सलग पाचवा दिवस! मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक ठप्प – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

सलग पाचवा दिवस! मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक ठप्प

मुंबई – पावसाच्या दमदार हजेरीपासून मध्य रेल्वेची वाहतूक सोमवारपासून आज सलग पाचव्या दिवशी विस्कळीत झाली आहे. मुलुंड स्थानकादरम्यान शॉर्ट सर्किट झाल्यामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचे समजते आहे. तर दोन्ही दिशेकडील धीम्या मार्गावरील लोकलचा नाहूर, कांजुरमार्ग, विद्याविहार या स्थानकांवर थांबा दिला जात नाही आहे. तरीही या लोकल २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे पावसाच्या दिवसांत दुपारच्या वेळी प्रवाशांना हाल सोसावे लागत आहेत.

दरम्यान, मध्य रेल्वेच्या या रोजच्याच रडगाण्यामुळे हैराण झालेल्या संतप्त प्रवाशांनी डीआरएमना पत्र लिहिले. निदान आता तरी या वाहतुकीत सुधारणा होईल, अशी आशा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र आजही तीच परिस्थिती असल्याने प्रवासीही हतबल झाले आहेत. तसेच पावसाच्या पहिल्या सरी कोसळल्यानंतर रेल्वेचे वेळापत्रक सतत ५ दिवस कोलमडले मग मान्सून दाखल झाल्यानंतर याहून अधिक भीषण परिस्थिती असेल की काय, अशी भीती प्रवाशांमध्ये पसरली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार – अमित शहा

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब केला. देवेंद्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘तुमच्याकडे काही काम नसेल तर मीम्स बनवा’, सोनाक्षीचे ट्रोलर्सना उत्तर

मुंबई – कौन बनेगा करोडपती -11 मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या रामायण या पौराणिक कथेतील प्रश्‍नावरील उत्तराने सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावे लागत आहे. सोनाक्षी...
Read More
post-image
लेख

व्हिएतनाम युद्धाविरोधात उभी राहिलेली अमेरिकेची आघाडीची अभिनेत्री जेन फोंडा

साठ-सत्तरच्या दशकातील अमेरिकेची आघाडीची, सुप्रसिद्ध, नामवंत अभिनेत्री जेन फोंडा एका वेगळ्याच कारणासाठी सगळ्या जगभर ओळखली जाते आणि अमेरिकेतील लाखो लोकांकडून तिच्यावर आजही प्रखर टीका...
Read More
post-image
देश

एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिलेला गुगलची मानवंदना

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध गिर्यारोहक आणि माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांचा आज 80 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने गुगलने खास डूडल...
Read More