सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत! प्रवासी संतप्त – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत! प्रवासी संतप्त

मुंबई – पावसाच्या दमदार हजेरीमुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वे विस्कळीत झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही तेच हाल होते. कहर म्हणजे आज सलग तिसऱ्या दिवशीही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याचे समजते आहे. त्यामुळे मुंबईला येणाऱ्या चाकरमान्यांना आणि शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मनस्ताप सोसावा लागत आहेत. मध्य रेल्वेच्या या रोजच्याच रडगाण्यामुळे हैराण झालेल्या संतप्त प्रवाशांनी आज डीआरएमना पत्र लिहिले आहे. निदान आता तरी या वाहतुकीत सुधारणा करण्यात येईल, अशी आशा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पावसाच्या पहिल्या सरी कोसळल्यानंतर रेल्वेचे वेळापत्रक सतत ३ दिवस कोलमडले मग मान्सून दाखल झाल्यानंतर याहून अधिक भीषण परिस्थिती असेल की काय, अशी भीती प्रवाशांना वाटत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More