सर्व सर्व्हेंचा एकच निर्णय! फिर एक बार मोदी सरकार, महाराष्ट्रातही मोदी लाट! राष्ट्रवादीला फार मोठा धक्का बसणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

सर्व सर्व्हेंचा एकच निर्णय! फिर एक बार मोदी सरकार, महाराष्ट्रातही मोदी लाट! राष्ट्रवादीला फार मोठा धक्का बसणार

नवी दिल्ली – सर्व वृत्त वाहिन्यांनी आणि सर्व्हे करणार्‍या संस्थांनी वर्तविलेल्या एक्झिट पोलच्या एकमुखी अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा मोदी लाट येणार आहे. देशात भाजपा प्रणित एनडीएची सत्ता पूर्ण बहुमतांनी येणार आहे. सर्वच सर्व्हेंनी भाजपा व मित्र पक्षांना 300 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तविलेला आहे. देशात काँग्रेसची पुन्हा एकदा वाताहात होणा आहे. मोदी हेच पुन्हा परत पंतप्रधान होणार आहेत. महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादीचा सफाया होत भाजपा आणि सेनेला सर्वात जास्त 42 ते 45 जागा मिळणार आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पार नामशेष होणार आहेत. त्यातही राष्ट्रवादीला एकच जागा मिळण्याचा धक्‍कादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे. मावळमध्ये पार्थ पवार यांचा अजित पवारांच्या जिव्हारी लागणारा पराभव होणार आहे. तर संभाजीच्या भूमिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेले अमोल कोल्हे हे शिरूरमधून हरणार आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेच्या जागा पूर्वीपेक्षाही वाढण्याची शक्यता आहे. तर मुंबईत सर्वच्या सर्व सहा जागा सेना-भाजपा युतीला मिळणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांच्या सरकारच्या विरोधात जनतेची असंतोषाची लाट आहे. जनता नोटबंदी आणि जीएसटीमुळे संतापलेली आहे. यावेळी मोदींचा आणि भाजपाचा पराभव निश्‍चित आहे, असा आभास निर्माण करण्यात आला होता. मात्र जनता आज मोदींच्या करिश्म्यामुळे भारावलेली आहे. हेच या सर्व्हेक्षणाने दाखवून दिले आहे.

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा प्रताप दिसून आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या पक्षाच्या उमेदवारांमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस – राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे. मोठ्या खटाटोपाने मावळच्या मैदानात उतरविलेल्या पार्थ पवारांना आयुष्यातील पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. हा मावळमधील पराभव शरद पवार आणि अजित पवार यांना हादरवून टाकणारा आहे. सर्वात धक्‍कादायक बाब म्हणजे ज्यांना कोणीही हरवू शकत नाही असे सातारचे महाराज उदयनराजे भोसलेही पराभवाच्या छायेत आहेत. धनंजय महाडीक, संजयमामा शिंदे, समीर भुजबळ, शिरूरमधून निवडणूक लढविणारे संभाजी म्हणून लोकप्रिय असलेले अमोल कोल्हे यांचाही धक्‍कादायक पराभव होणार आहे. फार तर सुप्रिया सुळे या एकट्याच विजयी होतील असा अंदाज आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेदेखील नांदेडमधून पराभूत होतील, असे निवडणूक सर्व्हेमध्ये सांगितले आहे. हिंगोली, सिंधुदुर्ग रत्नागिरी, चंद्रपूर, भंडारा, अकोला, गोंदिया, औरंगाबाद अशा सर्वच ठिकाणी काँग्रेस पराभूत होणार आहे. काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी आणि वंचित आघाडीने खाल्लेली काँग्रेस राष्ट्रवादीची मते यामुळे दोन्ही काँग्रेस गारद झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीची एकही जागा निवडून येणार नसली तरी त्यांनी काँग्रेसराष्ट्रवादीच्या सर्व जागा पाडून भाजपा-सेनेला आगळीवेगळी भेट दिली आहे.

मात्र टीव्ही 9 मराठी आणि सी-व्होटर यांनी एकत्रित केलेल्या सर्व्हेमधून महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला 34 जागा तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 14 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 जागा, शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा तर काँग्रेसला 2 जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या 22 जागांवरुन 19 जागांवर घसरण होईल तर शिवसेनेच्या खासदारांची संख्याही कमी होईल. शिवसेना यंदाच्या निवडणुकीत 15 जागा जिंकेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसला 8 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

देश पातळीवर मोदी यांचा करिश्मा पुन्हा एकदा चालला आहे. तर काँग्रेससहित सर्व विरोधी पक्षांच्या महागठबंधनला प्रचंड धक्‍का बसला आहे. काँग्रेस आघाडीतील अनेक प्रादेशिक पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यातील स्वतःच्या जागादेखील टिकविता आलेल्या नाहीत. त्यामुळे भाजपाची ताकद 336 जागांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर काँग्रेससहित सर्व विरोधी पक्ष 210 जागांपर्यंत मजल मारू शकतील. या 210 जागांमध्ये एकट्या काँग्रेसला फार तर 65 ते 70 जागा मिळतील. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या राजस्थान, छत्तिसगड आणि मध्य प्रदेश या राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला सत्तेवरून हटवून तिथे सत्ता काबिज केली होती. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीत अवघ्या 5 महिन्यानंतर भाजपाने कमबॅक केले आहे. भाजपाला राजस्थानात 25 जागांपैकी तब्बल 16 जागा भाजपाला मिळणार आहेत. तसेच छत्तिसगडमध्ये 11 जागांपैकी 6 जागा भाजपाला मिळणार आहेत. मध्य प्रदेशातील 29 जागांपैकी 20 जागा भाजपाला मिळणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदी भाषीक पट्ट्यात भाजपा स्थीरस्थावर होणार आहे.

खूब लढी मर्दानी वह झाँसीवाली राणी थी, ममता बॅनर्जी यांनी बंगाल ताब्यात ठेवला

शक्‍तिपणाला लावून प्रचाराचा आगडोंब उसळविला. केंद्र सरकारच्या अतिरिक्‍त फौजा आणि कार्यकर्त्यांच्या लाटा बंगालमध्ये नेऊन धडकविल्या. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये 10 ते 15 जाहीर सभा आणि रोड शो केले. शेवटच्या टप्प्यात तर हिंसाचारही घडवून आणला. मात्र एवढा सुलतानी कहर होऊनही ममता बॅनर्जी या झाँसीच्या राणीसारख्या एकट्या लढल्या. ममता बॅनर्जी या आक्रसताळी आणि भांडकुदळ आहेत, असा सर्व देशभर भाजपाने प्रचार केला. तसेच ममता या हिंदूद्वेष्ट्या आहेत असाही भडक प्रचार केला. तरीही त्यांना पश्‍चिम बंगालमध्ये 42 पैकी 25 ते 26 जागा मिळणार आहेत. तर एवढी ताकद लावल्यामुळे भाजपालाही कधी नव्हे त्या 14 जागा मिळणार आहेत. भाजपाला मिळणार्‍या या जागा काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आहेत. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या जागा तशाच कायम राहणार आहेत.

एक्झिट पोलच्या गॉसिपवर विश्वास नाही- ममता बॅनर्जी

मतदानोत्तर एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा स्पष्ट बहुमतासह एनडीए सरकार विराजमान होणार, असा अंदाज वर्तविण्यात आल्यानंतर त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. ‘एक्झिट पोल’च्या या गॉसिपवर माझा विश्‍वास नाही, अशी तिखट प्रतिक्रिया पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. एक्झिट पोलच्या गॉसिपआडून हजारो ईव्हीएमध्ये फेरफार करण्याचे कारस्थान रचले जात आहे. म्हणूनच सर्व विरोधी पक्षांनी एकजूट दाखवण्याची गरज आहे. पूर्ण ताकदीनिशी आणि आक्रमकपणे या सर्वाला तोंड देण्याची गरज आहे, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

चंद्राबाबूंचा गड जाणार

निवडणूक निकालांचे सर्व्हेक्षण येण्यापूर्वीच 3 दिवस अगोदर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे विरोधी पक्षांची मोट बांधून सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यांच्या सर्व पक्षांच्या नेत्यांची भेटीगाठी चालल्या होत्या. मात्र त्यांच्या आंध्र प्रदेशातील 25 लोकसभांच्या जागांपैकी त्यांना फक्‍त 7 जागा मिळणार आहेत. तर वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांना तब्बल 18 जागा मिळणार आहेत. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांचे आंध्रातच खच्चीकरण होणार आहे. कर्नाटकात भाजपा पुन्हा एकदा सत्तारूढ होण्याची शक्यता आहे. कारण कर्नाटकातील लोकसभेच्या 28 जागांपैकी तब्बल 19 ते 20 जागा भाजपाला मिळणार आहेत. तर काँग्रेस आणि मुख्यमंत्री असलेल्या जनता दल सेक्युलरला अवघ्या 7 ते 8 जागा मिळणार आहेत.

पंजाबमध्ये काँग्रेस आपला गड राखण्याची शक्यता आहे. तर हरियाणामध्ये भाजपा आपली सत्ता व खासदार राखणार आहे. बिहारमधील 40 जागांपैकी 30 जागा भाजपा आणि संयुक्‍त जनता दलाला मिळणार आहेत. झारखंडमधील 14 जागांपैकी 10 जागा, आसामधील 14 जागांपैकी 10 ते 11 जागा, उत्तर प्रदेशात 80 पैकी 30 ते 35 जागा, हिमाचलमधील 4 ही जागा, दिल्लीमधील 7 पैकी 6 जागा व ईशान्य भारतातील नागालँड, मणिपूर, मिझोरम, सिक्‍कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आदी राज्यातील 25 पैकी किमान 12 जागा भाजपाला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजपाने उत्तर प्रदेशात सपा- बसपाच्या एकजुटीमुळे गमावलेल्या 30 ते 40 जागा भाजपा पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा, केरळ, ओडिशा, तेलंगणा, आदी राज्यांमध्ये भरून काढणार आहे. त्यामुळेच भाजपा आणि मित्रपक्ष 300 चा आकडा पार करणार आहे. त्यामध्ये भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना, संयुक्‍त जनता दल, लोकजनशक्‍ति पार्टी, रिपब्लीकन पार्टी, एआयडीएमके, शिरोमणी अकाली दल आदी पक्षांच्याही जागांचा समावेश असणार आह

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More