सर्व मुस्लिम बांधवांनी देशासाठी एकत्र यावे! उध्दवजींचे आवाहन – eNavakal
News निवडणूक महाराष्ट्र राजकीय

सर्व मुस्लिम बांधवांनी देशासाठी एकत्र यावे! उध्दवजींचे आवाहन

माणगाव- पाकिस्तान आमचा दुश्मन आहे तसा तुमचाही दुश्मन आहे. जर उद्या युध्द झाले तर पाकिस्तानने टाकलेला बॉम्ब घर पाहून पडणार नाही, धर्म बघून पडणार नाही. म्हणून सर्व मुस्लिम बांधवांनी देशासाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले. उध्दव ठाकरे आज रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत बोलत होते.
पुढे बोलताना उध्दवजी म्हणाले की, आपल्या समोर मुद्दा सरळ आहे. उमेदवार कसा आहे तो काय करणार आहे. रायगड म्हणजे शिवराय. अंतुले साहेबांनी कुलाबाचे रायगड असे नाव केले, अस े आमचे जुने नाते आहे. भगव्याला कलंक लागणार नाही याची मला चिंता नाही. जयंत पाटील यांनी या मातीशी आणि जमिनीशी द्रोह करू नये. तुम्ही मार्ग चुकीचा निवडला आहात वेळीच सावरा असा उपदेशही त्यांनी यावेळी शेकापचे जयंत पाटील यांना दिला. पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, भविष्यात आपण नदीजोड प्रकल्प करणार आहोत. ही निवडणुक गीते साहेबांना निवडुन देण्यासाठी नाही आहे. धनुष्यबाणाला मत म्हणजे स्वतःच्या हितासाठी दिलेले मत. गेल्या काही दिवसांपुर्वी आमचे भाजपासोबत मतभेद होते. ते मतभेद वैयक्तिक नसून जनतेसाठी होते आणि आताही युती जनतसाठीच केलेली आहे. ही युती देव, देश आणि धर्मासाठी केली आहे. पाच वर्ष आम्ही काम करत होतो तेव्हा हे थंडगार झोपले होते आणि आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकर्‍यांची भेट घेत आहेत. आता शरद पवारांना दुष्काळग्रस्त शेतकरी दिसत आहे का?, शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करत होती तेव्हा तुम्ही कुठे होता? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. माझ्या कोकणवासियांची जमिन घेऊन हे कारखानदार होणार आणि माझ्या शेतकर्‍याला वार्‍यावर सोडणार. यासाठीच येथील प्रकल्पांना विरोध केला. शिवरायांना आपण देव का मानतो कारण ते रयतेचे राजे होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची 50-60 वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्ता होती. ते इतके माजलेत की पाच वर्षात सुधारणार नाहीत. देशद्रोहाचे कलम काँग्रेस काढून टाकणार, हे तुम्हाला पटतेय का? आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत. पण काँग्रेसमध्ये त्यांचा उमेदवार अजून ठरलेला नाही. शरद पवारांना राहुल गांधी, राहुल गांधीला शरद पवार, ममतांना मायावती आणि मायावतींना अखिलेश पंतप्रधान चालेल का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. राहुल गांधींच्या आजीने गरिबी हटावची घोषणा केली, त्यांच्या घरातल्यांची हटली पण गरिबांचे काय? अशी बोचरी टीकाही राहुल गांधींवर केली. विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असा विजय मला रायगडात हवा आहे असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी यावेळी केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More