सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवली – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवली

नवी दिल्ली – आजीवन बंदीची शिक्षा झालेला भारतीय संघाचा गोलंदाज श्रीसंत याला आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. बीसीसीआयकडून त्याच्यावर लावण्यात आलेली बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली असून क्रिके़ट खेळण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच बीसीसीआयला श्रीसंतवर बंदी घातलेल्या निर्णयाचा तीन महिन्यात पुर्नविचार करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

दरम्यान, कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयाने श्रीसंतला दिलासा दिला असताना बीसीसीआयकडून बंदी हटविण्यात आली नाही. त्यामुळे बीसीसीआयच्या निर्णयाला श्रीसंतने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरील बंदी हटवली आहे. 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपवरून दिल्ली पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा आणि 10 लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला होता.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

ट्रेकिंग करणार्‍या तरुणावर बिबट्याचा हल्ला

नाशिक – नाशिकच्या प्रसिद्ध पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग करणार्‍या एक तरुणावर काल सकाळी बिबट्याने हल्ल्यात केला. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेतला परंतु बिबट्या हाती...
Read More
post-image
News देश

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट वादाच्या भोवर्‍यात! चित्रपटासाठी गीत लिहिले नाही! जावेद अख्तर

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने या चित्रपटात नरेंद्र...
Read More