सर्वाधिक चार चाकी वाहने असणारे नवी मुंबई राज्यात तिसऱ्या क्रमांकावर – eNavakal
महाराष्ट्र

सर्वाधिक चार चाकी वाहने असणारे नवी मुंबई राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

नवी मुंबई – नियोजनबद्ध आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या आधुनिक शहरात वाहतुकीचे प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालले आहेत. या वाहतूक समस्येचं योग्य नियोजन करता यावे यासाठी नवी मुंबई महानगरपालिके तर्फे शहरात आयआयटी मार्फत सर्वे करण्यात आला. आयआयटी ने केलेल्या सर्वेत नवी मुंबई शहरातील 67 टक्के नागरिकांकडे चारचाकी वाहन आहे तर 82 टक्के नागरिकांकडे दुचाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

नवी मुंबई मध्ये असलेला एमआयडीसी पट्टा व आयटी क्षेत्राच जाळ यामुळे शहरात चारचाकी वाहन असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या आकडेवारीवरून चारचाकी गाड्यांच्या संख्येत मुंबई, पुणे नंतर नवी मुंबई हे तिसऱ्या क्रमांकाचे शहर बनले आहे. या सर्वे मध्ये वाशी ,घणसोली व ऐरोली मध्ये सर्वाधिक वाहन असल्याचे समोर आले आहे. आता या सर्वे नंतर शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवीन वाहतूक धोरण शहरात राबविण्यात येईल अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त रामास्वामी एन यांनी व्यक्त केली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका

मुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....
Read More
post-image
News देश

एम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप! महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड

नवी दिल्ली-  लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...
Read More
post-image
News मुंबई

नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण

मुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर

ग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...
Read More
post-image
News मुंबई

पुणे होर्डिंग दुर्घटना! सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...
Read More