सर्वात वेगवान धावणारी ‘ट्रेन 18’ वर दगडफेक – eNavakal
देश

सर्वात वेगवान धावणारी ‘ट्रेन 18’ वर दगडफेक

नवी दिल्ली – भारतीय रेल्वेची सर्वात वेगवान रेल्वे ‘ट्रेन-१८’ चे पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ डिसेंबरला उद्घाटन करणार आहेत. मात्र उद्घाटन करण्यापूर्वीच दिल्ली ते आग्रादरम्यान रेल्वेची चाचणी घेताना काहीजणांनी रेल्वेवर दगडफेक केल्याची माहिती जेष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दगडफेकीमुळे रेल्वेच्या काचा फुटल्याने रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरीचे जनरल मॅनेजर सुधांशू मनू यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. ‘ट्रेन-१८’ १८० किमीच्या स्पीडने दिल्ली ते आग्रा येथे धावत होती. रेल्वेने चाचणीसाठी १८१ किमीच्या स्पीडला धावत असताना काही जणांनी रेल्वेवर दगडफेक केली’, असे सुधांशू मनू यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

ट्रेन-१८ ही देशातील विनाइंजिन पहिली रेल्वे असणार आहे. दिल्ली ते वाराणसी येथे ही रेल्वे धावणार असून शताब्दी ट्रेनची ही जागा घेणार आहे.  या रेल्वेला बनवण्यासाठी १०० कोटींचा खर्च केला आहे. 16 कोच असलेली ही रेल्वे पूर्ण वातानुकूलित आहे.

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More