सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाजीत घटक “प्लास्टिक” – eNavakal
रविवार विशेष लेख

सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाजीत घटक “प्लास्टिक”

प्रकाश गुजर – 

राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला असून आता सर्वत्र प्लास्टिक बंदी होत असताना दिसत आहे. प्लास्टिक हे सर्वसामान्यांच्या जीवनातील एक मुख्य घटक आहे. या घटकाला वेगळे करणे मागील काही वर्षांपासून शक्य नव्हते. अनेकदा प्लास्टिक बंदीची घोषणा करुन देखील प्लास्टिक बंदी पूर्णतः झालेली नव्हती. राज्यात जसा गुटखा फक्त कागदावरच बंद आहे तीच गत प्लास्टिक बंदीची होती. प्लास्टिक पिशव्यांची जाडी वाढवून पातळ ऐवजी जाड्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सुरु करण्यात आला मात्र प्लास्टिकचा वापर काही थांबला नाही कारण प्लास्टिक हे सर्वसामान्यांच्या जिवनाचा आज एक अविभागीत घटक झाला आहे, त्यामुळे बंदी आणून देखील प्लास्टिकचा वापर थांबणार नाही. अशा अवस्थेत प्रशासनाद्वारे कोणती पाऊले उचलली गेली हे पहाणे तीतकेच महत्वाचे ठरेल, याच बरोबर प्लास्टिकचे दुषपरिणाम इतर कोणत्या देशात प्लास्टिक बंदी करण्यात आली भारतामधील इतर राज्यांमध्ये कशा स्वरूपाची प्लास्टिक बंदी लावली गेली याची माहिती ई-नवाकाळच्या वाचकांना या लेखातून मिळणार आहे.

प्लास्टिक बंदी कायदा- (नियम मोडणार्‍याला तीन महिने कोठडी, थर्माकॉलही बंद)

प्लास्टिक बंदी करुन राज्य सरकारने पर्यावरण सरक्षणासाठी मोठ पाऊल उचलले आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी 16 मार्च (शुक्रवारी) हे आदेश दिले असून आता प्लास्टिकला पुर्ण प्रतिबंद लागणार असल्याचे सांगितले होते. या आदेशाचे पालन न करणार्‍यांना 3 महिने जेल किंवा 25 हजार रुपयांचा दंड बसू शकतो. सध्या महापालिकेकडून 50 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक बॅग्जवर बंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून अध्यादेश आल्यावर त्याची अंमलबजावणी आयुक्तांच्या आदेशाने करण्यात येईल. फक्त प्लास्टिकच्या थैल्याच नव्हे तर थाळी, कप, प्लेट, ग्लास, कांटा चमचा, कटोरी, स्ट्रॉ, कटलरी यांच्यावरही बंदी आणली आहे. मात्र औषधांच्या बाटल्या, शेतीमधील घाण साफ करण्यासाठी वापरले गेलेले प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

प्लास्टिकचे पर्यावरणावर होणारे दुषपरिणाम-

प्लास्टिकच्या निर्मितीत अनेक रासायनिक घटकांचा समावेश असतो आणि प्लास्टिक हे खूपच टिकाऊ असते. त्याचे विघटन नैसर्गिकरीत्या वर्षानुवर्षे होत नाही. प्लास्टिकचा हा गुणधर्म पाणी, माती, पर्यावरण यासाठी अत्यंत घातक ठरत आहे. प्लास्टिकच्या पिशव्या किंवा प्लास्टिकची अन्य उत्पादने ही इतस्ततः पडली आणि त्यांचा मातीशी संबंध आला तर पाणी झिरपण्याच्या स्वाभाविक व नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा येणे, पाणी साचून राहणे, पाण्याचा स्तर असमतोल होणे आणि पर्यायाने त्या-त्या ठिकाणी मातीचा दर्जा खालावणे, असे दुष्परिणाम होतात. रासायनिक घटकांचा मातीवर परिणाम होतो तो वेगळाच. अशाचप्रकारे नदी, नाले व समुद्रातही भरमसाट प्रमाणात साचणार्‍या प्लास्टिकच्या कचर्‍याचा खूप मोठा परिणाम पर्यावरणावर होतो. जलाशये आणि त्यांचे जे स्वाभाविक चक्र असते ते प्लास्टिकमुळे बिघडून जाते. समुद्रात पडणारा सर्व प्लास्टिकचा कचरा समुद्र बाहेरच टाकत असतो. त्यामुळे समुद्रकिनारे तर अस्वच्छ होतातच, त्याशिवाय समुद्री जीवांच्या पैदाशीवरही विपरित परिणाम होतो. प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे कचरा जलाशयांतील तिवरांच्या झाडांमध्ये अडकून पडतात. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणारा हा महत्त्वाचा घटकही उद्ध्वस्त होऊ लागतो. नदी, नाले स्वच्छ, शुद्ध व निरोगी राहण्यासाठी त्यातील पाणी साचून न राहता प्रवाही राहणे, हे सर्वात महत्त्वाचे असते. परंतु, प्लास्टिकचा कचरा नेमका यालाच आडकाठी करतो आणि त्यामुळे अशी जलाशये अस्वच्छ होऊन आजार, रोग पसरवण्यासाठी कारणीभूत ठरतात. नदी, नाले तुंबले की त्या परिसरातील लोकांना मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्लास्टिकचे दुष्परिणाम हे एकंदरीतच मानवी आयुष्यासाठी भयावह आहेत.

प्लास्टिकमुळे पाणीही धोकादायक-

प्लॅस्टिकच्या बाटलीमधील पाणी पिणं धोकादायक आहे. न्यूयॉर्कच्या संशोधकांनी बाटलीबंद पाण्यामध्ये प्लॅस्टिकचे कण आढळत असल्याचं मत व्यक्त केले आहे. बाटलीबंद पाण्याचं उत्पादन करणार्‍या देशभरातील नावाजलेल्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. जगभरातून जमा केलेल्या बाटलीबंद पाण्याच्या 90 टक्के नमुन्यांमध्ये प्लॅस्टिक आढळलं आहे. नऊ देशांमधील बाटलीबंद पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले होते, त्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. चीन, अमेरिका, ब्राझील, इंडेनोशिया, केनिया, लेबनॉन,मेक्सिको, थायलंड याही देशांमधील बाटलीबंद पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. याप्रयोगत बिस्लेरीमध्ये 5230 तर अ‍ॅक्वाफिनात 1295 प्लास्टिकचे सुक्ष्म कण आढळून आले आहे. या कणामुळे पाणी पिणार्‍याच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

अन्य देशातील आणि राज्यातील स्थिती- (राजस्थानात आकारला लाखाचा दंड)

भारता बरोबर अन्य देशातही प्लास्टिक ही मोठी समस्या बनले आहे. पर्यावरणाला वाचवण्यासाठी अन्य देशांमध्येही सक्तीची प्लास्टिक बंदी मोहिम राबवली जात आहे. जगात प्रथमता बाग्लादेश (2002) मध्ये प्लास्टिक धोरण राबवले आहे या नंतर रवांडा, चिन, तायवान, मेसेडोनिया आणि केनिया या देशांनीही प्लास्टिक वस्तू आणि पिशव्यांवर बंदी आणली आहे. महाराष्ट्र राज्य सोडले असता राजस्थान येथे प्लास्टिक पिशव्यांवरून तब्बल 1 लाख दंड आकारण्यात आला आहे. यामुळे राजस्थानात देखील प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापर हा कमी प्रमाणात करण्यात येत आहे.

प्लास्टिकमुळे होणारे नुकसान-

आज सर्वत्र प्लास्टिकचा कचराच दिसतो. आज मच्छिमारांनी मासे पकडण्यासाठी जाळ्या लावल्या तर त्यात जवळपास 75 टक्के प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या व अन्य कचराच जमा होतो. यामुळे माशांच्या पैदास यावरही खूप मोठा परिणाम झाला आहे. प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये अधिक काळ खाद्यपदार्थ ठेवणेही आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते. प्लास्टिक हे प्रामुख्याने द्रव स्वरुपातील खाद्यपदार्थांसाठी हानिकारक असते. संबंधित प्लास्टिक कंटेनर किंवा पिशवी याच्या आतील स्तराचा थेट द्रव खाद्यपदार्थाशी संबंध येतो.

प्लास्टिकचा वापर सरकारने थांबवला असला तरीही प्लास्टिक बंदी ही सर्वसामान्यांवर अवलंबून आहे. प्लास्टिकचा वापर जितका कमी करता तीतकाच पर्यावरणाला निर्माण होणारा धोका कमी होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

सबरीमालात स्त्रियांनी प्रवेश केल्याने केरळ बुडाले

तिरुअनंतपुरम – रिझर्व्ह बँकेचे हंगामी निर्देशक एस गुरुमूर्ती यांनी अत्यंत वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले आहे. केरळवर आसमानी संकट कोसळले असून देशभरातून मदतीचा ओघ सुरू...
Read More
post-image
क्रीडा देश

#AsianGames2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच 10 नवीन गेम्स

जकार्ता – 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा जकार्ता येथील गिलोरा बंग कर्नो स्टेडियमवर संपन्न झाला. या वर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 नवीन गेम्स पहिल्यांदाच...
Read More
post-image
News देश

संगमनेर तालुक्यात भूकंप?

संगमनेर – तालुक्यातील घारगाव आणि माहुली परिसरात काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घारगाव आणि माहुली परिसरातील भूगर्भामध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

सचिन अणदुरेला ७ दिवसांची पोलीस कोठडी

औरंगाबाद – डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने शनिवारी धडक कारवाई केली. या कारवाईत सीबीआयने आरोपी सचिन अणदुरे याला औरंगाबादमधून अटक केली. आरोपी सचिन अणदुरेची...
Read More
post-image
गुन्हे देश

दिल्लीची मोस्ट वॉण्टेड ‘मम्मी’ अखेर गजाआड

नवी दिल्ली – तब्बल 113 गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेली दिल्लीची मोस्ट वॉण्टेड फरार ‘मम्मी’ बशीरन हिला पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानची मुळ रहिवासी असलेली बशीरन ही...
Read More