सरन्यायाधीशांविरोधातील षडयंत्राच्या दाव्याच्या चौकशीसाठी ‘ह्या’ समितीची नियुक्ती – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक न्यायालय

सरन्यायाधीशांविरोधातील षडयंत्राच्या दाव्याच्या चौकशीसाठी ‘ह्या’ समितीची नियुक्ती

नवी दिल्ली – देशाच्या सरन्यायाधीशांवरच लैंगिक शोषणाचे आरोप झाल्याने न्यायव्यवस्थेसह देशभरात खळबळ उडाली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात रचण्यात आलेल्या षडयंत्राचा तपास करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती ए.के. पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील समितीची नियुक्ती केली आहे. रंजन गोगोई यांच्या षडयंत्राच्या चौकशीसाठी

अॅड. उत्सव सिंह बैंस यांनी काही कागदपत्रे न्यायालयात सादर करत सरन्यायाधीशांविरोधात केलेल लैंगिक शोषणाचे आरोप हा एका मोठ्या कारस्थानाचा भाग असल्याचा त्यांनी दावा केला. या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्ती ए.के. पटनाईक हे तपास करणार असून सीबीआयचे संचालक आणि आयबीचे संचालक त्यांना तपासकार्यामध्ये मदत करतील, असे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी माझा लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. पीडित महिला सर्वोच्च न्यायालयातील एक सामान्य कर्मचारी होती. १० आणि ११ ऑक्टोबर २०१८ला रंजन गोगोईंनी तिचा शारीरिक छळ केला होता, असा दावा त्यांनी केला होता.

रंजन गोगोई हे भारताच्या सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्याधीश आहेत. ते ३ ऑक्टोबर २०१८ पासून सरन्यायाधीशपदी आहेत. यापूर्वी ते पजांब आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांनी दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ला राष्ट्रपती भवनात आपली पद व गोपनीयतेची शपथ घेतली.त्यांचा कार्यकाळ हा १३ महिनांचा राहणार असून ते दिनांक १७ नोव्हेंबर २०१९ला निवृत्त होतील.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

राज्यातील महापूर प्रशासकीय गलथानामुळे आरोप करणारी जनहित याचिका हायकोर्टात

मुंबई – कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही प्रशासकीय गलथानपणा आणि धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे बेदरकार उल्लंघन झाल्याचा आरोप करून कर्नाटक...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बीडच्या 15 गावातील विदारक चित्र

बीड – जिल्ह्यातील वडवली तालुक्यात शेतकर्‍यांचे विदारक चित्र दिसत आहे. दोन महिन्यांपासून पावसाचा थेंबही न पडल्याने पिके करपत चालली आहेत. त्यामुळे तालुक्यातील 15 गावातील...
Read More