‘सरकारी रुग्णालय मध्ये खाजगी डॉक्टर’ – eNavakal
आरोग्य देश

‘सरकारी रुग्णालय मध्ये खाजगी डॉक्टर’

नवी दिल्ली-  देशातील आरोग्य सेवा अधिक सुदृढ व्हावी, याकरिता केंद्र सरकार लवकरच शासकीय रुग्णालयामध्ये खाजगी डॉक्टरांना उपचार करण्यासाठी परवानगी देण्याच्या विचारात आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १२ कोटी एवढी आहे. रुग्णालयांची संख्या देखील योग्य प्रमाणात आहे,  मात्र यात डॉक्टरांची संख्या पुरेशी नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. ही परिस्थिती बदलून, आरोग्य सेवा अधिक उत्तम व्हावी यासाठी केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयामधून पदवी घेऊन स्वतःच्या रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना, सरकारी रुग्णायामध्ये काम करण्याची परवानगी नव्हती. यामध्ये लवकरच केंद्र सरकार  बदल करणार आहे.  परिणामी लवकरच खासगी डॉक्टर काही दिवसांमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार करताना दिसतील. अडचणीच्या काळात, परिस्थितीनुसार शासकीय रुग्णालयमध्ये पुरेसे डॉक्टर उपलब्ध नसले तर शासन कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नेमणूक करत असे.

शासकीय रुग्णालय मध्ये पुरेसा पगार मिळत नाही व तिथे काम करणाऱ्या डॉक्टरांना इतर कुठल्याच खासगी रुग्णालयामध्ये काम करण्याची परवानगी नसते. यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये खासगी डॉक्टर काम करत नाहीत. अशा अडचणींवर देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार तोडगा काढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More