सरकारी नोकरीसाठी आता एकच सामायिक परीक्षा द्यावी लागणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

सरकारी नोकरीसाठी आता एकच सामायिक परीक्षा द्यावी लागणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – सरकारी नोकरीच्या शोधात विविध खात्यासाठी विविध परीक्षा द्यावा लागतात. मात्र, मोदी सरकारच्या नव्या घोषणेमुळे आता एकच सामायिक परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि सरकारवरचा ताण कमी होणार आहे. या सामायिक परीक्षेसाठी राष्ट्रीय भरती संस्था (National Recruitment Agency) स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा (CET) देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल.

शिक्षण झाल्यानंतर विविध क्षेत्रात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध परीक्षा द्यावा लागतात. प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपापल्या परीक्षा ठेवतात आणि चांगल्या नोकरीच्या महत्त्वाकांक्षेने तरुण या सगळ्या परीक्षा देतात. आता मोदी सरकारने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे हे चित्र पालटण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.

आता सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सामायिक परीक्षा असेल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था (National Recruitment Agency) स्थापन करण्यात येणार आहे. या संस्थेत एकदा नोंदणी केली की, एकच परीक्षा देऊन आपली योग्यता युवकांना सिद्ध करावी लागेल. त्यामुळे नोकरीसाठी दारोदारी परीक्षा देत भटकण्याची वेळ युवा पिढीवर येणार नाही.

प्रकाश जावडेकर यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, “युवकांना जागोजाही परीक्षा द्यायला जावं लागू नये म्हणून एकच Common Eligibility test असेल. यात गुणवत्ता सिद्ध करून उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल.”

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सरकारी नोकरीसाठी आता एकच सामायिक परीक्षा द्यावी लागणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – सरकारी नोकरीच्या शोधात विविध खात्यासाठी विविध परीक्षा द्यावा लागतात. मात्र, मोदी सरकारच्या नव्या घोषणेमुळे आता एकच सामायिक परीक्षा घेण्यात येणार आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मोरी मासळींचा खच, श्रावण संपल्याने खरेदीसाठी खवय्यांची गर्दी

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात मच्छीमारी बांधवांना गेले 2 दिवस मोरी मासळीची चांगली बंपर खच मिळाली असून श्रावण महिना संपल्याने मोरी मासळीच्या खरेदीसाठी खवय्यांनी आज समुद्रकिनारी...
Read More
post-image
मनोरंजन महाराष्ट्र

65 वर्षांवरील कलाकारांना परवानगी, अमित देशमुख यांची घोषणा

मुंबई – चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या 65 वर्षांवरील कलाकार, क्रू सदस्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

पंडित जसराज यांचे पार्थिव मुंबईत दाखल, विलेपार्ले स्मशानभूमीत उद्या अंत्यसंस्कार

मुंबई – पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही पद्मपुरस्कारांनी सन्मानित झालेले शास्त्रीय संगीत क्षेत्रातील विख्यात प्रसिद्ध गायक पंडित जसराज यांचे काल वयाच्या ९० व्या वर्षी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बंगळुरू – ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू गोपालस्वामी कस्तुरीरंगन (89) यांचे आज चमारजापेट येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, अशी माहिती कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे...
Read More