कराची – येत्या काळात भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार का याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
ज्यावेळी भारतीय संघ २००५ साली पाकिस्तान दौऱ्यावर आला होता त्यावेळीही वातावरण काहीसं तणावाचंच होतं. दोन्ही बाजूने प्रयत्न सुरु होते. क्रिकेटच्या मैदानावर त्यावेळी जे घडलं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर भारताविरुद्ध हरला. पण असं झाल्यानंतरही उपस्थित प्रेक्षकांनी भारतीय संघाचं कौतुक केलं, ते वातावरण खूप आश्वासक होतं. सध्या (भारतात) ज्या विचारांचं सरकार आहे ते पाहता क्रिकेटच्या मैदानावरचं वातावरण हे भयंकर असेल.” इम्रान खान Sky Sports वाहिनीवरील Out of Exile या डॉक्युमेंट्रीमध्ये बोलत होते.
काही दिवसांपूर्वी कोरोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक यांच्यात क्रिकेट मालिका खेळवावी असा पर्याय माजी गोलंदाज शोएब अख्तरने सुचवला होता. परंतू भारतीय खेळाडूंनी याला नकार दर्शवला होता. सध्या बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. वर्षाअखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आपली पहिली कसोटी मालिका खेळेल. पाकिस्तान संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.