सरकारबरोबर चर्चा निष्फळ! मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सरकारबरोबर चर्चा निष्फळ! मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

मुंबई – सर्वोेच्च न्यायालयाने वैद्यकीय व दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नसल्याचा निर्णय दिल्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. हे सुरू असलेले आंदोलन संपण्याची चिन्हे आता धुसर होत चालली आहेत. मराठा विद्यार्थी आणि चंद्रकांत पाटील यांच्यात आज दुपारी बैठक पार पडली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने, लेखी आश्‍वासन न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्‍न चिघळला आहे. सरकारने या मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी वैद्यकीय प्रवेशाला सात दिवसांची स्थगिती दिली आहे. एक आठवड्याची मुदतवाढ मिळाल्यानंतरही आझाद मैदानात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. आज दुपारी दोन वाजता आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आणि मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हेही उपस्थित होते. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. यावेळी बोलताना आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, आम्हाला कोणतीही लेखी बाब मिळाली नाही, फक्त आश्‍वासन मिळाले आहे. आमचे आंदोलन सुरुच राहणार आहे. अध्यादेश काढणे मोठी गोष्ट नाही, सरकार त्याला वेळ का लावत आहे, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला. तर बैठकीनंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिल्यानंतर ही पहिली प्रवेश प्रक्रिया आहे. कायदा आगोदर झाला आहे आणि प्रवेश प्रक्रिया परत सुरू झाली आहे. तसेच स्टे नसल्या कारणाने प्रवेश प्रक्रियांचे दोन राऊंड झाले. ठोस निर्णय घेण्याबाबतीत आमची चर्चा झाली. हे शासन या मुलांचे नुकसान होऊ देणार नाही. तसेच या मुलांचे कायद्याच्या चौकटीत काही नुकसान होऊ नये यासाठी सरकार पावले उचलत आहे. कायद्याचा अभ्यास करूनच मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले. मुख्यमंत्रीही या विद्यार्थ्यांचे नुकसान हाऊ देणार नाहीत. 30 नोव्हेंबरला कायदा झाला होता परंतु 22 फेब्रुवारीला प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे पूर्वलक्षीप्रभावाने प्रवेश देण्यात येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आणि आमची पीआयएल फेटाळली. विद्यार्थ्यांनी मते ऐकण्यासाठी ही बैठक बोलावली होती, असे पाटील यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More