सरकारने कामगार दिन साजरा करू नये, मनसेचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र – eNavakal
News मुंबई

सरकारने कामगार दिन साजरा करू नये, मनसेचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

मुंबई – महाराष्ट्रातील बहुसंख्य कामगारांवर अन्याय होत असताना आपल्या सरकारला कामगार दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार नाही, असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. तसेच कामगार भवनात कामगारांवरील अन्यायाचे निवशारमषनियमांप्रमाणे 90 दिवसांत का होत नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
मनोज चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, 1 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील संपुर्ण जग साजरे करत असते. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील समस्त कामगारांनी महाराष्ट्र दिन साजरा करतानाच कामगारांवर होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ आपल्या सरकारच्याविरोधात हातावर काळ्या फिती लावून सरकारविरूध्द आपला राग, रोष व्यक्त करावा, असे आवाहन करत अशा प्रकारे आम्ही कामगार दिन साजरा करत असल्याचे सांगितले आहे. ज्या महाराष्ट्रात आपण जागतिक कामगार दिन साजरा करत आहोत त्या महाराष्ट्रातील कामगार खरोखरच सुखी समाधानी आहे का?, अस प्रश्नही चव्हाण यांनी आपल्या निवेदनातून मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. कंत्राटी कामगारांना सरकारी नियमाप्रमाणे वेतन व इतर सुविधा भत्ता आजमितीस बर्‍याच अस्थापनेत मिळत नाही. हे आपणास व संबंधित खात्याच्या मंत्र्यांना समाहित असूनही त्यावर कोणतीच कारवाई केली का जात नाही? स्थानिकांना नोकरीत 80 टक्के प्राधान्य मिळावे यासाठी शासनामार्फत कोणती यंत्रणा राबवली जात आहे? असे अनेक प्रश्न मनोज चव्हाण यांनी उपस्थित केले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. ते व्हायब्रेंट गुजरातच्या विश्व संमेलनाच्या नवव्या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. या संमेलनाचे आयोजन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘तुला पाहते रे’चं ‘रॅपचीक’ सॉंग ऐकलंत?

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘तुला पाहते रे’ सध्या फारच चर्चेत आहे. ते म्हणजे ईशा-विक्रांत यांच्या लग्नामुळे. चाहत्यांनी या दोघांचे अनेक मिम्स,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More