सरकारचे मोठे अपयश! गुजरातहून रेल्वेने दुध आणावे लागले – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सरकारचे मोठे अपयश! गुजरातहून रेल्वेने दुध आणावे लागले

मुंबई – राज्यात आज दुसर्‍या दिवशीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाच्या गाड्या रोखणे सुरूच ठेवले आहे. पालघरमध्ये तळ ठोकून असणारे स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गुजरातहून मुंबईला येणारे अमुलचे टँकर रोखत परत माघारी धाडले. त्यामुळे बिथरलेल्या सरकारला थेट गुजरातहून मुंबईत पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून दूध आणावे लागले. खा. राजू शेट्टी यांचे हे मोठे यश असून त्यांच्या आंदोलनासमोर सरकार अपयशी झाल्याचे सपशेल दिसत आहे.

सलग दुसर्‍या दिवशीही स्वाभिमानीचे आंदोलन राज्यभर सुरू आहे. दुधाला प्रतिलिटर पाच रूपये अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचा धसका घेत पोलीस संरक्षणात मुंबईत दुधाचे टँकर आणण्यात आले. प्रत्येक टँकरसोबत एक पोलीस व्हॅन फिरत होती. बीडमधील पाली गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला. ज्याप्रमाणे एखाद्या पाण्याच्या टँकरमधून पाणी सोडले जाते त्याप्रमाणे येथील टँकरमधून दूध सोडले गेले. तब्बल 20 हजार लीटर क्षमतेचा हा टँकर होता. टँकर फोडल्यानंतर गावातल्या लोकांनी एकच गर्दी करत हंडे आणि कळश्यांमधून दूध घरी नेले. जालन्याच्या पासोंडी शिंदी गावातही गाड्या अडवून दूध रस्त्यांवर सोडण्यात आले. कोल्हापूरातील वळवडी येथे आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दुध घालण्यासाठी आलेल्या दूध उत्पादकांना थांबवून त्यांना समज देण्यात आली.

तर विधानसभेत शिवसेना प्रवक्त्या निलम गोर्‍हे यांनी सांगितले की, बाहेरील राज्यातून येणार्‍या दुधावर प्रतिलिटर तीन रूपये कर लावावा, जेणेकरून परराज्यातून येणार्‍या दुधावर चाप बसेल अशी मागणी केली. तर विधान परिषदेत धनंजय मुंडे म्हणाले की, सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी व पतंजलीचे दुध येण्याची वाट पाहतेय का?, असा सवाल केला.

दिल्लीतील बैठकीचे शेट्टींना निमंत्रण नाही
महाराष्ट्रात पेटलेला दुधाचा प्रश्न दिल्लीत पोहोचला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत आज शरद पवार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दुधाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार होते. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नागपूर दौरा रद्द करत दिल्लीत दाखल झाले होते. मात्र या बैठकीसाठी खासदार राजू शेट्टी यांना निमंत्रणच देण्यात आले नव्हते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More