समाजवादी पार्टी देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक पक्ष; ६३५ कोटींची संपत्ती – eNavakal
देश राजकीय

समाजवादी पार्टी देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक पक्ष; ६३५ कोटींची संपत्ती

नवी दिल्ली – देशातील स्थानिक राजकीय पक्षांमध्ये उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टी सर्वांत श्रीमंत पक्ष ठरला आहे. राजकीय पक्षांवर नजर ठेवणारी संस्था असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने (एडीआर) दिलेल्या आपल्या अहवालात समाजवादी पार्टीची एकूण ६३५ कोटींची संपत्ती असल्याचे घोषित केले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये १९८ पटीने समाजवादी पार्टीच्या संपत्तीत वाढ झाली आहे. यासह तामिळनाडू राज्यातील सत्ताधारी पक्ष अण्णाद्रमुक पार्टीची संपत्तीही तब्बल 155 पटीने वाढली आहे. तर महाराष्ट्र राज्यात शिवसेनेची संपत्ती ९२ पटीने वाढली आहे.

एडीआरने देशातील २२ स्थानिक पक्षांच्या संपत्तीचा सादर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. २०११-१२ ते 2015-16 या कालावधीत स्थानिक राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या संपत्तीच्या आधारे हा आहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार, २०११-१२ मध्ये समाजवादी पार्टीने 212.86 कोटींची संपत्ती घोषित केली होती. त्यानंतर 2015-16 मध्ये समाजवादी पार्टीची संपत्ती वाढून 634.96 कोटी झाली आहे. तर याच कालावधीत अण्णाद्रमुक पार्टीची संपत्तीमध्ये 88.21 कोटींची वाढ झाली असून आता पक्षाची एकूण संपत्ती 224.87 कोटी झाली आहे. तर शिवसेनेची संपत्ती 20.59 कोटींवरून 39.56 कोटी झाली आहे.

 

‘आप’ची संपत्ति 3.76 कोटी

आम आदमी पार्टीने भ्रष्टाचाराविरोधात साफसफाईची नारा लगावत नोव्हेंबर २०१२ मध्ये राजकारणात प्रवेश केला. 2012-13 मध्ये पार्टीकडे १.१६ कोटींची संपत्ती होती. 2015-16 मध्ये संपत्ती वाढून 3.76 कोटी झाली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे! पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – आज लोकसभा निवडणूक २०१९चे निकाल जाहीर झाले. भाजपाने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपा मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान...
Read More