समाजवादी नेते खासदार अमरसिंह यांचे निधन – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

समाजवादी नेते खासदार अमरसिंह यांचे निधन

मुंबई – एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात भारताच्या राजकीय, सांस्कृतिक आणि औद्योगिक जगतात “अमर अकबर अँथोनी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रिकूटातील समाजवादी पक्षाचे नेते आणि खासदार अमर सिंह यांचे आज सिंगापूर येथील रुग्णालयात मूत्रपिंडाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. बॉलीवूडमधील शहेनशहा अमिताभ बच्चन, राजकारणातील नेते अमरसिंग आणि उद्योग जगतातील उद्योगपती अनिल अंबानी हे त्रिकुट तब्बल पंधरा वर्ष एकत्र होते.

अमर सिंह हे उत्तर प्रदेश मधील एक मातब्बर नेते होते. त्याचप्रमाणे ते समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांचे खासम खास होते. समाजवादी पार्टीला उद्योग जगताच्या जवळ आणण्याचे आणि पार्टीला आधुनिक बनविण्याचे काम मुलायमसिंग यादव यांनी केले. अमिताभ बच्चन यांच्या पडत्या काळात अमर सिंह यांनी त्यांना साथ दिली होती. बच्चन कुटुंबाचे व त्यांचे घरोब्याचे संबंध होते. जया भादुरी यांना समाजवादी पार्टीचे खासदार बनविण्याचे काम अमरसिंह यांनी केले होते. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील एकेकाळच्या गाजलेल्या अभिनेत्री जयाप्रदा यांनाही निवडणुकीच्या रणांगणात उतरून लोकसभेत खासदार म्हणून पाठविण्याचे कामही अमरसिंह यांनीच केले होते. 2013 साली त्यांच्यावर मूत्रपिंडाची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतरही ते फारसे स्वस्थ वाटत नव्हते. अधून मधून सिंगापूरच्या रुग्णालयात जाऊन ते 1 -2 महिने उपचार घेऊन परत येत होते. मात्र यावर्षीच्या सुरुवातीलाच त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर ते तब्बल सहा महिने सिंगापूरच्या रुग्णालयातच होते. तेथूनच ते भारताच्या राजकीय स्थितीवर आपले व्हिडिओ पाठवून मत व्यक्त करीत होते. मृत्यूसमयी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी पंकजा आणि दोन जुळ्या मुली हजर होत्या. अमर सिंह यांच्या मृत्यूमुळे भारतातील सर्वच राजकीय पक्षांतील मित्रांना जबरदस्त धक्का बसला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यातील पहिल्या टेलिआयसीयू प्रकल्पाचा भिवंडीत शुभारंभ

मुंबई – भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा ऑनलाईन शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिदक्षता...
Read More
post-image
देश मनोरंजन

गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली

मुंबई – सुप्रसिद्ध गायक एस.पी.सुब्रमण्यम यांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यामुळे त्यांना आता अतिदक्षता विभागात हालवण्यात आलं असून, डॉक्टर्स त्यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज 12 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर 10 हजारपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई, दि.१४ : राज्यात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

स्वातंत्र्यादिनानिमित्त राज्यातील 58 पोलिसांचा गौरव, केंद्राकडून पोलिस पदके जाहीर

नवी दिल्ली – 74व्या भारतीय स्वातंत्र्यादिनानिमतित्त देशातील एकूण ९२६ पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात येणार आहेत. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने आज त्यांची नावे जाहीर केली. पोलिसांच्या...
Read More
post-image
Uncategoriz

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांची मदत

मुंबई – कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास...
Read More