समलैगिकतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच घ्यावा – केंद्र सरकार – eNavakal
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश महत्वाच्या बातम्या

समलैगिकतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच घ्यावा – केंद्र सरकार

दिल्ली – केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारे कलम ३७७ रद्द करण्यासंदर्भातले आज प्रतिज्ञापत्र दाखल केले. यावेळी समलैंगिकतेला गुन्हा ठरवणाऱ्या कलम  ३७७ संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयानेच निर्णय घ्यावा, असे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले.

भारतीय दंड विधानातील ३७७ विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय पीठासमोर ही सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्यावतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. या प्रतिज्ञापत्रामध्ये कलम ३७७ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या सद्सदविवेकबुद्धीवर हा निर्णय सोडत आहे’, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच या खटल्यातील व्याप्ती वाढल्यास म्हणजेच लग्न किंवा लिव्ह इन रिलेशनचा संबंध आला तर यासंदर्भात आमच्यावतीने सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, असे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्राच्या वतीने स्पष्ट केले. तसेच, दोन सज्ञान व्यक्तींनी संमतीने अनैसर्गिक ठेवल्यास तो गुन्हा ठरणार नाही. मात्र, गे आणि लेस्बियनच्या हक्कासंदर्भात आम्ही कोणताही निर्णय देणार नसल्याचे पीठाने स्पष्ट केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आरोग्य देश

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे १३२ जणांचा बळी

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वर तापाचा कहर अद्यापही सुरुच असून यामुळे मृतांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. तसेच इतर रुग्णालयांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारीही अद्याप...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणीप्रश्नावरून विधानसभेत गदारोळ! १५ मिनिटे तहकूब

मुंबई – अधिवेशनाचा चौथ्या दिवशी आज विधानसभेत पाणीप्रश्नावरून प्रचंड गदारोळ झाला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन

मुंबई – राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे जनतेला आता दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यात बरीच भांडणंं, वाद विवाद, आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस...
Read More
post-image
देश

लखनऊत वर्‍हाडाची गाडी कोसळली! २२ जणांना वाचवले, ७ मुले बेपत्ता

लखनऊ – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आज सकाळी लग्नातून परतणाऱ्या वर्‍हाडाच्या गाडीला भीषण अपघात झाला. ही गाडी इंदिरा कालव्‍यात कोसळली. या गाडीत एकूण २९ वर्‍हाडी होते. त्यापैकी...
Read More