समलैंगिकता हा भारतीय परंपरेचा मुख्य भाग – eNavakal
News देश न्यायालय

समलैंगिकता हा भारतीय परंपरेचा मुख्य भाग

दिल्ली – भारतीय प्राचीन परंपरा हि मोठी असून समलैगिकता हा याच परंपरेचा मुख्य भाग असल्याचा युक्तिवाद ज्येष्ठ वकिल अशोक देसाई यांनी आज  सर्वोच्च न्यायालयात केला आहे. समलैगिक संबंधांना गुन्हा ठरवणा-या कायद्यातील ३७७ कलम रद्द करावा या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.   तर केंद्र सरकारने हा निर्णय सर्वोच्च न्यायालयावर सोपविला आहे.

समलैगिक संबंधांना गुन्हा ठरवणा-या कायद्यातील ३७७ कलम रद्द करावा या याचिकेवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे.  यासंदर्भात बोलताना न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, मेंटल हेल्थकेअर अॅक्ट अंतर्गत लैंगिक कलाकडे बोट दाखवत कुणालाही भेदभावाची वागणूक देण्यास बंदी आहे. हा धागा पकडत ज्येष्ठ लकिल सी. यु. सिंग यांनी दावा केला की, दुर्दैवानं लैंगिक कल कुठलाही असला तरी समान वागणूक देण्याची पद्धत सगळ्या क्षेत्रांत अद्याप लागू केलेली नाही.  अतिरिक्त महाधिवक्ता तुषार मेहता यांनी हिंदू तत्वज्ञानामध्ये प्रकृती व विकृती यांच्यात साहचर्य आहे, परंतु ते तत्वज्ञानाच्या व अध्यात्माच्या पातळीवर असल्याचे सांगत त्याची सांगड लैंगिकतेशी अथवा समलैंगिकतेशी घालू नये असा युक्तिवाद केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

मला वडिलांच्या लग्नाला आईने तयार केले – सारा

नवी दिल्ली – कॉफी विथ करन सीजन ६ मध्ये अलीकडेच अभिनेता सैफ अली खान आणि त्याची मुलगी अभिनेत्री सारा अली खान दोघे आले होते....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराटला कोणतीच ताकीद दिली नाही – बीसीसीआय

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला माध्यमे आणि चाहत्यांशी नम्रतेने वाग अशी ताकीद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने दिली असे वृत्त काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

सई आणि ‘तो’

मुंबई – मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सईने एका तरुणासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सईनं या फोटोकॅप्शनमध्ये पिवळ्या हार्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

नाशिक-कल्याण प्रवास अधिक सोयीचा होणार

नाशिक – प्रवाशांना नाशिक-कल्याण प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. कारण लवकरच नाशिक-कल्याण लोकल सुरू होणार आहे. येत्या 15 दिवसांत या लोकलची चाचणी घेण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

अकोले – अकोले शहरातील उपनगरातील गजबजलेल्या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी...
Read More