समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र उलगडणार ‘या’ चित्रपटातून – eNavakal
मनोरंजन मुंबई

समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र उलगडणार ‘या’ चित्रपटातून

मुंबई – तेजस्वी आणि ओजस्वी संत अशी ओळख असलेल्या समर्थ रामदास स्वामी यांच्यावर लवकरच ‘रघुवीर’ हा मराठी सिनेमा येऊ घातला आहे. रामदास स्वामींच्या मुख्य भूमिकेत कोण दिसेल हे मात्र अजून गुलदस्त्यातच असले तरी या सिनेमाचे पहिले पोस्टर सोमवारी रिलीज करण्यात आले.

‘शुभ मंगल सावधान’ हा मंत्र उच्चारताच त्या १२ वर्षाच्या मुलाने भर लग्नातून धूम ठोकली. रानोमाळ भटकला. वैराग्य धारण केले आणि त्याला जीवनाचे सार सापडले. हेच जीवनाचे सार आपल्याला ‘दासबोध’ या ग्रंथातून आदर्श जीवन जगण्याचे धडे देतो. हा तरुण म्हणजे महाराष्ट्रातील ‘संत सांप्रदायातील एक संत समर्थ रामदास स्वामी’. रामाचे परमभक्त म्हणून संपूर्ण जग ज्यांना ओळखते ते समर्थ रामदास स्वामी आहेत. रामदास स्वामी म्हंटले की आपल्याला मनाचे श्लोक इतकंच आठवतं पण त्याचं कार्य मर्यादित नाही. समर्थ रामदास स्वामींनी तरुणांमध्ये प्रखर राष्ट्रभक्ती निर्माण केली. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच या ओजस्वी संताची ओळख आजच्या पिढीला करून देण्यात येणार आहे.

अभिराम भडकमकर यांनी कथा व पटकथा लिहिली असून मंदार चोळकर यांची गीते आणि अजित परब यांनी संगीत दिले आहे. निलेश कुंजीर यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाचे चित्रिकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. या सिनेमात अनेक गाजलेले अभिनेते आहेत असं बोललं जातंय. ते कोण हे लवकरच उघड केलं जाणार आहे. पण ‘रघुवीर’ हा संत समर्थ रामदास स्वामी यांचा चरित्रपट आजच्या तरुणांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे वाटते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे आहे’, असे म्हटले आहे. ‘आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे काही वेगळ्या मनसुब्याने काम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

१७८ वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी ‘थॉमस कुक’ बंद

लंडन – १७८ वर्ष जुनी असलेली ब्रिटीश कालीन ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक बंद करण्यात आली आहे. यामुळे १६ देशांतील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या...
Read More
post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More