सबरीमाला मंदिरात प्रवेशासाठी 11 महिला जंगल मार्गाने आल्या होत्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

सबरीमाला मंदिरात प्रवेशासाठी 11 महिला जंगल मार्गाने आल्या होत्या

तिरुमाला – केरळमध्ये सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी आज सकाळी 11 महिलांनी मंदिराकडे कूच केल्याने पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र मंदिरापासून 5 किलोमीटर अंतरावरच भाविकांनी मज्जाव केल्याने या महिलांचा प्रयत्न असफल ठरला. विशेष म्हणजे या मदुराईमधून जंगल मार्गाने आल्या होत्या.

दर्शनासाठी आलेल्या या महिला चेन्नईतील ‘मानिधी’ संघटनेच्या सदस्या होत्या. मंदिरात प्रवेश मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नसल्याचा पवित्रा या महिलांनी घेतला होता. तणावपूर्ण परिस्थिती पाहता पथानामथिट्टा जिल्ह्यात 27 डिसेंबरपर्यंत जमावबंदी जारी करण्यात आली आहे. आज जवळपास 30 महिला मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे कालपासूनच पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. यावेळी महिलांनी वाहनाचा वापर न करता जंगल मार्गाने चालत मंदिराकडे पोहचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या काळ्या रंगाच्या साड्यांमुळे विरोध करणार्‍या भाविकांनी त्यांना 5 किमी अंतरावरच रोखून धरले. दरम्यान, आज अयप्पाचे भक्त कोट्टायम रेल्वे स्थानकावर आंदोलन करताना दिसले.

जारी करण्यात आली आहे. आज जवळपास 30 महिला मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे कालपासूनच पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. यावेळी महिलांनी वाहनाचा वापर न करता जंगल मार्गाने चालत मंदिराकडे पोहचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या काळ्या रंगाच्या साड्यांमुळे विरोध करणार्‍या भाविकांनी त्यांना 5 किमी अंतरावरच रोखून धरले. दरम्यान, आज अयप्पाचे भक्त कोट्टायम रेल्वे स्थानकावर आंदोलन करताना दिसले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जन्मोजन्मी हीच पत्नी मिळो! पुण्यात पुरुषांनी वटवृक्षाला मारल्या फेऱ्या

पुणे – आज राज्यभरात वटपौर्णिमेचा उत्साह आहे. आजच्या दिवशी वडाच्या झाडाला दोरी बांधून सात फेऱ्या मारतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी आजच्या दिवशी...
Read More
post-image
देश

नेपाळच्या शाळांमध्ये चीनी भाषेची सक्ती

काठमांडू – नेपाळमधील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चीनी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात अआले आहे. सध्या चीन आणि नेपाळ हे दोन देश अधिक जवळ येत असून भाषा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लवकरात लवकर राम मंदिर उभारले जाईल – उद्धव ठाकरे

अयोध्या – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आपल्या १८ खासदारांसह आज अयोध्येत पोहोचले. रामलल्लाचं दर्शन घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More