‘सनबर्न’ला परवानगी, तर मग डॉल्बीला का नाही?- उदयनराजे – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘सनबर्न’ला परवानगी, तर मग डॉल्बीला का नाही?- उदयनराजे

सातारा – काहीही झाले तरी गणेश विसर्जन मंगळवार तळ्यातच होणार, असे ठणकावतानाच, ‘सनबर्न’ला परवानगी देता मग डॉल्बीला का नाही? असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत बोलताना केला. गेले काही दिवस गणेश विसर्जनाच्या प्रश्नावरुन सातार्‍यात वादळ उठले आहे. पोलीस, प्रशासन तसेच न्यायालय यांच्या निवाड्यावरुन गणेश विसर्जनासंदर्भात दरराजे नवनव्या विघ्नांची मालिका सुरु आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात आहेत. सातार्‍यातील मंगळवार तळ्यात विसर्जन करण्यास खासदार उदयनराजे भोसले यांनी परवानगी दिली असली तरी त्या अनुषंगाने दररोज प्रश्न उपस्थित केले जात असल्यामुळे संभ्रम वाढला आहे. मंगळवार तळ्यात विसर्जन केल्यास न्यायालयाचा अवमान होईल, असे वातावरण तयार करण्यात आले आहे. या पाश्वभूमीवर आज नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खासदार उदयनराजे यांच्या उपस्थितीत मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक बोलविण्यात आली होती. उदयनराजे यांच्या रोखठोक व सडेतोड भूमिकेमुळे ही बैठक खर्‍या अर्थाने वादळी ठरली.

बैठकीत बोलताना उदयनराजे यांनी पोलीस व प्रशासनाच्या धार्मिक कार्यात कोलदांडा घालण्याच्या भूमिकेवर सडकून टीका केली. काही क्रियानिष्ठ लोकांमुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गणेश विसर्जना दिवशी जर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास पोलीस व प्रशासनच जबाबदार असेल. मंगळवार तळे आमच्या मालकीचे आहे. त्यामुळे त्याबाबत काय निर्णय घ्यायचा तो अधिकार आम्हालाच आहे. तळ्यात विसर्जन करण्यास आम्ही यापूर्वीच परवानगी दिली आहे.

तळे आमच्या मालकीचे असल्यामुळे न्यायालयाचा अवमान होण्याचा प्रश्नच येत नाही. कारवाई व्हायची असेल तर ती आमच्यावर होईल. कार्यकर्त्यांवर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी निश्चिंत रहावे, असे उदयनराजे म्हणाले. उद्या तुम्ही म्हणाल, उदयनराजे यांनी जलमंदिरात जावू नये. तुमचा काय संबंध? आमच्या घरात आम्ही काय करायचे तो आमचा प्रश्न आहे. या लोकांना कायदा कळतो की नाही, हा प्रश्नच आहे. खरेतर यांनी या संदर्भात पोलीस महासंचालकांकडून अभिप्राय मागवायला हवा होता, अशा शब्दांत त्यांनी पोलीस यंत्रणेला फटकारले. प्रत्येक उत्सवावेळी कोलदांडा घालण्याची पोलीस व प्रशासनाची भूमिका योग्य नाही. लोकांच्या मनात भय निर्माण करणे बरोबर नाही, असे सांगून उदयनराजे यांनी आपण सदैव कार्यकर्त्यांच्या पाठिशी आहोत, याचा पुनरुच्चार केला.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

खंबाटकी घाटालगत ट्रक-बोलेरोच्या अपघातात तीन ठार! दोन गंभीर

सातारा – सातार्‍याच्या खंबाटकी घाटालगत असलेल्या हॉटेल पार्क इन सहारा समोर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रकला सातारा बाजूकडून येणार्‍या बोलेरो जीपने पाठीमागून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

प्रज्ञा सिंहला पक्षातून काढून टाका, नितीशकुमार यांची भाजपाकडे मागणी

भोपाल – हिंदी भाषिक पट्ट्यातील भाजपाचा एकमेव मित्रपक्ष असलेल्या जनता दल संयुक्तचे भाजपाशी असलेले संबंध बिनसले आहेत. जदयूचे सर्वेसर्वा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

(Live) #Elections2019 दुपारी १ वाजेपर्यंत ३९.८५ टक्के मतदान

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज ५९ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. आज 8 राज्यांमध्ये 59 जागांवर मतदान होणार आहे. त्यानंतर 23...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गडचिरोली बंद, नक्षलवाद्यांनी वखारीतील ट्रक पेटवला

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी अतिदुर्गम भागात मोठ्या प्रमाणात लाल रंगाचे बॅनर लावून आज ‘गडचिरोली जिल्हा बंद’चे आवाहन केले आहे. या बंदसाठी नक्षलवाद्यांनी एटापल्ली ते आलापल्ली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

ब्रिटनमध्ये नवीन शस्त्र कायदा मंजूर, शिखांना कृपाण बाळगण्याची परवानगी

लंडन – शस्त्रास्त्रांबाबत ब्रिटनच्या सरकारने नवीन कायदा मंजूर केला असून यात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात शिख बांधवांना पारंपारिक कृपाण जवळ बाळगण्याची परवानगी देण्यात आली...
Read More