सचिन वाझेंच्या पत्रावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

सचिन वाझेंच्या पत्रावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यानंतर आता निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे मंत्री ऍड. अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून राज्यात पत्र लिहिण्याचा नवा ट्रेंड आल्याचे म्हटले आहे.

‘महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरू आहे. अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येत आहेत. एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे ज्यामध्ये जेलमध्ये आहेत त्यांच्याकडून पत्र लिहून घ्यायचे आणि सरकारविरोधात आवाज उठवायचा. असे असेल तर जेलमध्ये अजूनही अनेक लोक आहेत. त्यांच्याकडूनही खूप काही लिहून घेतलं जाऊ शकतं. या प्रकारचं घाणेरडं राजकारण या देशात आणि राज्यात याआधी झालेलं नाही’, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच ‘यामध्ये अनिल परब यांचं नाव आलं आहे. अजित पवार, अनिल देशमुख यांचं नाव आलं आहे. गुन्हा केल्याने अटकेत असलेल्या आरोपीकडून जेलमध्ये लिहून घेतलं जातं आणि तो पुरावा म्हणून समोर आणलं जातं. हे राजकीय षडयंत्र आहे. मी अनिल परब यांना ओळखतो. अशा कामांत ते कधीच नसतात. अनिल परब यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. खरा शिवसैनिक हा दुसरं काही करेल पण बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेऊन काही करणार नाही, कोणताही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही’, असे संजय राऊत यांनी म्हटले.

त्याचबरोबर ‘राष्ट्रीय तपास यंत्रणा आपण ज्यांना म्हणतोय त्यांच्यासाठी विरोधी पक्ष गालीचे अंथरत आहे हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या सरकारला जर कोणी अशा प्रकारे कोंडीत पकडून अस्थिर करण्याचे डावपेच करत असतील तर यशस्वी होणार नाही. काल एका पत्रलेखकाचं पत्र आलं, एनआयएच्या हाती पत्र आहे. हे पत्रलेखक एनआयच्या ताब्यात आहेत. एखाद्याची प्रतिमा मलीन करण्यासाठी इतक्या यंत्रणा वापरल्या जात आहेत. त्या पत्राची सत्यता कोणी सांगू शकत नाही. ते पत्र लिहिणारी व्यक्ती किती प्रतिष्ठित किंवा संत महात्मे आहेत याविषयी विरोधी पक्षाने एकदा स्पष्ट करावं’, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान, सचिन वाझे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करणारे पत्र न्यायालयात सादर केले. ‘आपल्याला पोलीस दलात सहभागी करून घेतल्यानंतर काही ठिकाणी निदर्शने झाली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा निलंबित करण्याचे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दूरध्वनी संभाषणाद्वारे दिली होती. मी पवार यांचे मतपरिवर्तन करतो, मात्र त्या बदल्यात दोन कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी देशमुख यांनी केली. असमर्थता दर्शवताच देशमुख यांनी नंतर सावकाश द्या’, असे सांगितल्याचा दावा वाझे यांनी पत्रात केला हाये. तसेच या वर्षी जानेवारी महिन्यात देशमुख यांनी शासकीय निवासस्थानी बोलावून शहरातील १६५० बारकडून प्रत्येकी तीन ते साडेतीन लाख रुपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. तर मंत्री परब यांनी ‘एसबीयुटी’च्या (सैफी बु-हाणी अप लिफ्टमेंट ट्रस्ट) विश्वास्तांविरोधात प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. ही चौकशी बंद करण्याच्या मोबदल्यात ५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव विश्वास्तांसमोर ठेवण्यास सांगितले. तसेच महापालिकेच्या कंत्राटदारांविरोधात निनावी तक्रारीवर ‘सीआययू’कडून चौकशी सुरू होती. परब यांनी यातील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप वाझे यांनी या पत्रात केला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

सचिन वाझेंच्या पत्रावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यानंतर आता निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

दैनंदिन रुग्णवाढीचा नवा उच्चांक; 24 तासांत तब्बल 1,26,789 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली – राज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असतानाच देशभरातही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. आता तर देशात दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे मुंबईत निधन

मुंबई – गिरणी कामगारांच्या हक्कासाठी लढा देणारे गिरणी कामगार संघर्ष समितीचे दत्ता इस्वलकर यांचे बुधवारी (7 एप्रिल) दुःखद निधन झाले. ते 71 वर्षांचे होते....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

कोरोनाचा उद्रेक! आता ‘या’ शहरातही नाईट कर्फ्यू

मुंबई – देशात सध्या कोरोनाचा प्रसार अतिशय झपाट्याने होत आहे. त्यामुळे सर्व राज्यांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. आता महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातपाठोपाठ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

पंतप्रधान मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर आज सकाळी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांनी लसीचा...
Read More