सचिन अंदुरेच्या मित्राकडून ७.६५ बोअरचे पिस्तूल हस्तगत – eNavakal
News गुन्हे महाराष्ट्र

सचिन अंदुरेच्या मित्राकडून ७.६५ बोअरचे पिस्तूल हस्तगत

मुंबई – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी एटीएस आणि सीबीआयला मंगळवारी मोठे यश मिळाले आहे. दाभोळकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले 7.65 बोअरचे पिस्तूल औरंगाबाद येथून सचिन प्रकाशराव अंधुरे याच्या मित्राच्या घरातून पोलिसांनी जप्त केले आहेत. याच पिस्तूलमधून दाभोळकर यांच्यावर फायरिंग झाल्याचा सीबीआय आणि एटीएसचा संशय आहे. अंधुरे याच्या चुलत भावासह मित्राच्या घरी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मुंबईसह महाराष्ट्रात घातपाताचा कटाचा पर्दाफाश केल्यानंतर अटक केलेल्या तिन्ही हिंदुस्तवादी संघटनेचे तीन संशयित वैभव सुभाष राऊत, शरद भाऊसाहेब कळसकर आणि सुधनवा सुधीर गोंधळेकर असे तीनजण सध्या पोलीस कोठडीत आहेत. या तिघांच्या चौकशीत सचिन अंधुरे याच्या नावाचा उल्लेख झाला होता. सचिन हाच नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा मारेकरी असल्याचे उघडकीस येताच त्याला सीबीआयच्या एका विशेष पथकाने अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या सीबीआय कोठडीत आहेत. या कोठडीत त्याने दाभोळकर यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली देताना या गुन्ह्यांत त्याच्यासोबत शरद कळसकर हादेखील होता. दाभोळकर यांच्या सचिनने एक तर शरदने दोन गोळ्या झाडल्या होत्या. सचिनच्या चौकशीतून आलेल्या माहितीनंतर सीबीआय आणि एटीएसच्या एका विशेष पथकाने सोमवारी औरंगाबाद येथील देवलई परिसरातील सचिनचा चुलत भाऊ आणि मित्राच्या घरी छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी एक पिस्तूल हस्तगत केले आहेत. तेच पिस्तूल दाभोळकर यांच्या हत्येत वापरले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. याच प्रकरणात आणखी तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रोहित रेगे, नचिकेत इंगळे आणि अंजिक्य सुरले अशी या तिघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी कट्यार, तलवारही जप्त केले आहेत. जप्त केलेले पिस्तूलसह कट्यार आणि तलवार तपासणीसाठी न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा रिपोर्ट लवकरात लवकर देण्याची मागणी सीबीआय आणि एटीएसने केली आहे. दाभोळकर यांच्या हत्येसह कॉ. पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येत याच मारेकर्‍यांचा सहभाग आहेत का, गौरी लंकेश, डॉ. दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येत 7.65 बोअर देशी बनावटीच्या पिस्तूलचा वापर झाला होता. त्यामुळे जप्त केलेले पिस्तूल या गुन्ह्यांतील आहे का नाही याचाही सीबीआय आणि एटीएस तपास करीत आहेत. याच गुन्ह्यांत यापूर्वी डॉ. विरेंद्र तावडे याला सीबीआयने अटक केली होती. चौकशीत त्याने सीबीआयसह अन्य तपास यंत्रणेला काहीच सहकार्य केले नव्हते. त्यामुळे त्याने दाभोळकर यांच्या शूटरला सुपारी देऊन बोलाविल्याचा सीबीआयचा संशय होता. आता पोलीस गुन्ह्यांतील बाईकचा शोध घेत आहेत. राऊत आणि कळसकर हे दोघेही कर्नाटकला गेले होते, तिथे जाण्यामागे त्यांचा काय उद्देश होता याची चौकशी सुरु आहे. चौकशीत सुधनवा गोंधळेकर हा या ग्रुपचा मुख्य लिडर म्हणून काम पाहत होता. त्यानेच वैभवच्या घरी गावठी शस्त्रसाठा आणि स्फोटके ठेवण्यासाठी दिली होती असे तपासात उघडकीस आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

दडी मारलेल्या पावसाची राजापूरमध्ये दमदार हजेरी

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने तशी पाठच फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नदीतील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘फ्लोटर वॉटर ड्रोन’चा वापर

पिंपरी – शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्सना नवे नियम लागू

मुंबई – मुंबईतील काही टॅॅक्सी ड्रायव्हर्सना आता परमिट दिले जाणार नाही. जे ड्रायव्हर्स कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अडकेलेले आहेत किंवा ज्यांच्यावर सध्या कोर्टात केस सुरु...
Read More
post-image
महाराष्ट्र

साईनाथनगरमध्ये टोळक्याचा धुमाकूळ; धारदार हत्यारांनी गाड्यांची तोडफोड

पिंपरी – दिवसाढवळ्या 15 ते 18 जणांच्या टोळक्यांनी सशस्त्रांसह निगडी, साईनाथनगरमध्ये धुमाकूळ घातला. धारदार हत्यारांनी रस्त्यांवर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली. दिवसाढवळ्या...
Read More
post-image
दिनविशेष मनोरंजन

दिनविशेष : बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’ गुलशन ग्रोवर

आज म्हणजे बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’ म्हणजेच गुलशन ग्रोवर यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९५५ रोजी दिल्ली येथे झाला. दिल्लीतील श्रीराम कॉलेजमधून कॉमर्स विषयात पदवी...
Read More