सचिन अंदुरेच्या तीन मित्रांना एटीएसने घेतले ताब्यात – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

सचिन अंदुरेच्या तीन मित्रांना एटीएसने घेतले ताब्यात

औरंगाबाद – महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात एटीएसने शनिवारी शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला अटक केली. त्यानंतर आता एटीएसने औरंगाबादमधून सचिन अंदुरेच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली असून तिघांच्या घरातून काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

सचिन अंदुरेची कसून चौकशी केल्यानंतर मंगळवारी पहाटे पोलिसांच्या पथकाने औरंगाबादमध्ये सचिन अंदुरेच्या तीन मित्रांच्या घराची झाडाझडती घेतली. यातील एकाच्या घरात पोलिसांना हत्यारे सापडली असून अन्य दोघांच्या घरातून कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. औरंगाबादमधील पैठण रोड येथे ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More
post-image
News महाराष्ट्र

डीएसकेंच्या 13 महागड्या गाड्यांचा लिलाव होणार

पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अर्थात डीएसके यांच्या 13 महागड्या गाड्या लिलावात...
Read More