सचिनची 10 क्रमांकाची जर्सी निवृत्ती घेणार – eNavakal
क्रीडा देश मुंबई

सचिनची 10 क्रमांकाची जर्सी निवृत्ती घेणार

नवी दिल्ली- त्याशिवाय त्याने 33 आणि 99 या दोन क्रमांकाच्या जर्सीदेखील वापरल्या होत्या. पण त्याची 10 क्रमांकाची जर्सी आणि सचिन तेंडुलकर हे एक समीकरणच होऊन बसले होते. 2013 मध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय सामन्यांतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मुंबईकर शार्दुल ठाकूरने 10 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरल्याचे बघायला मिळाले होते. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कोलंबो येथील सामन्यात ठाकूरने ही 10 क्रमांकाची जर्सी घातली होती. त्यानंतर तो टिकेचा धनीदेखील ठरला होता. आता बीसीसीआयने अनौपचारिकरित्या 10 क्रमांकाची जर्सी निवृत्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च 2012 मध्ये सचिन शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. तसेच मुंबई इंडियन्सतर्फे आयपीएल स्पर्धेत खेळताना देखील सचिन 10 क्रमांकाची जर्सी घालूनच खेळत होता. त्याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याची 10 क्रमांकाची जर्सी निवृत्ती केली होती. मात्र बीसीसीआयमध्ये असा कोणताही नियम लागू नसल्यामुळे अन्य खेळाडूंना या जर्सीसह मैदानात उतरणे शक्य होते. जर्सीच्या क्रमांकावरून खेळाडूंमध्ये होणारी तुलना आणि निर्माण होणारा वाद याचा विचार करून अखेर बीसीसीआयने लोकप्रिय झालेली 10 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत होणार्‍या क्रिकेट सामन्यांत 10 क्रमांकाची जर्सी वापरण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर 10 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्यात येत असल्यामुळे भविष्यात ती कुठल्याही भारतीय खेळाडूला आता घालता येणार नाही. या अगोदर असा पायंडा युरोपमध्ये मोठ्या फुटबॉल खेळाडूंबाबत पाडला गेला होता. आता ते लोण भारतातदेखील येऊन पोहचले आहे.

क्रिकेट मैदानात दोन दशकांहून जास्त काळ आपल्या लाजवाब फलंदाजीने सारे क्रिकेट विश्व गाजवणार्‍या धावांचे यंत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या मास्टर्स ब्लास्टर सचिन तेंडुलकरची 10 क्रमांकाची जर्सी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. सचिनने 10 क्रमांकाची जर्सी घालून बर्‍याचदा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन पूर्ण शिथिल होणार नाही

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चला देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे लॉकडाऊन संपायला ७ दिवसांचा कालावधी...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊनचा फज्जा, चौपाटीवर नागरिकांची गर्दी

भाईंदर – ‘जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास खुली राहतील, गर्दी करू नका’, अशा सूचना राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहेत. तरीही अनेक ठिकाणी भाजीपाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, ‘भारताने मदत केली तर ठीक, अन्यथा…’

न्यूयॉर्क – बलाढ्य अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा मदतीची...
Read More
post-image
महाराष्ट्र

भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन टनेल! एपीएमसीचा निर्णय

नवी मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केट निर्जंतुक करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या प्रवेशद्वारावर आजपासून सॅनिटायझेशन टनेल बसविण्यात आले आहे,...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने ५ वाजल्यानंतर बंद

कल्याण – कल्याण-डोंबिवली शहरातील मेडिकल आणि दवाखाने वगळता अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आज मंगळवारपासून सकाळी ५ ते सायंकाळी ५ यावेळेतच सुरू राहणार आहेत. सायंकाळी...
Read More